शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

पेणमध्ये १ लाख कांदळवनाची लागवड

By admin | Updated: April 23, 2017 02:19 IST

स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात

- जयंत धुळप, अलिबाग स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात या लोखंडनिर्मिती उद्योगाच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ आणि पेण तालुक्यांतील पाच गावांतील ३४ महिला स्वयंसहाय्यता गटांनी राबवला आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्याजवळील खारपाणी घुसून नापीक झालेल्या शेतात पुन्हा भातशेतीची लागवड करता येणार आहे. कांदळवन लागवडीचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. धरमतर खाडीकिनारचा फुटलेला ५ हजार ९०१ मीटर लांबीचा बंधाराही जेएसडब्ल्यू इस्पातच्या १ कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बांधण्यात आला. त्यामुळे नापिक झालेली १५ गावांतील ५ हजार हेक्टर भातशेती खाऱ्या पाण्यापासून संरक्षित झाली. बंधाऱ्याचे काम सुरू असतानाच, तज्ज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ आणि किनारी गावांतील जाणकार ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कांदळवनांच्या कोणत्या जातीची रोपे तयार करायची, हे निश्चित करण्यात आले. तसेच रोपे तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यूच्या वनस्पती व फलोत्पाद संशोधन विभागाच्या माध्यमातून रोपवाटिका तयार करण्यात आल्या. या रोपवाटिकांमध्ये स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सुमारे ३४० महिलांनी रोपांची निर्मिती केली.गतवर्षी ८ आॅक्टोबर रोजी ग्रामसमृद्धी संकल्प चमू, जेएसडब्ल्यूचे अधिकारी, जेएसडब्ल्यू इस्पात सामाजिक उत्तरदायित्व निधी विनियोग समितीचे प्रमुख मोहन घाडगे आणि ३४ महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत कांदळवन रोप लागवडीस प्रारंभ करण्यात आला. २५ ते २८ आॅक्टोबर २०१६दरम्यान लागवड करण्यात आलेल्या या सर्व रोपांचे वनस्पती तज्ज्ञांच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले. वर्षभरात रोपांनी चांगलाच जोम धरला असून, धरमतर खाडीकिनारच्या नैसर्गिक जैवविविधतेस नव्याने समृद्धी प्राप्त झाल्याचे शनिवारच्या जागतिक वसुंधरा दिनी स्पष्ट झाले आहे.भात लागवड शक्यलागवड करण्यात आलेल्या १ लाख ५ हजार ४३५ कांदळवनांच्या रोपांमुळे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या माऱ्याची तीव्रता कमी होईल. शिवाय खाडीकिनारी गावांत यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा भात लागवडीखाली येऊ शकेल, असा आशावाद धरमतर खाडीकिनारच्या या १५ गावांतील शेतकरी ग्रामस्थांना आहे. आगामी काळात विठ्ठलवाडी ते भाल या किनारी भागातील ५० एकर क्षेत्रांत कांदळवन लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती, जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली आहे.