शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कशेडीतील अपघातात एक ठार

By admin | Updated: February 7, 2016 00:22 IST

मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात कंटेनरची कारला धडक होऊन कंटेनर कारसह दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारचालक राजकुमार वराट

पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात कंटेनरची कारला धडक होऊन कंटेनर कारसह दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारचालक राजकुमार वराट (रा. पुणे) हे जागीच ठार झाले, तर कारमधील अन्य पाच गंभीर जखमी झाले.अपघात शनिवारी दुपारी १२.१५ च्या दरम्यान झाला असून, कारमधील सर्वजण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघाले होते. कशेडी घाटात दरीत गेलेल्या कारला काढण्यासाठी पोलादपूर पोलीस ठाणे येथील पीएसआय महाजन, पीएसआय अंधेरे, म्हात्रे व कशेडी टॅप येथील अनिल धाडीगावकर पीएसआय, झगडे, महाडिक, भोसले, चव्हाण यांच्यासमवेत रा.जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्र महाराज ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने जखमींना पोलादपूर येथे आणण्यात आले.शासनाने सुरू केलेल्या १०८ सेवेचा बोजवारा उडालेला दिसून आला. घटनास्थळी खेडच्या दोन रुग्णवाहिका असूनही प्रोटोकॉलमुळे आम्ही जखमींना पुणे येथे नेऊ शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली गेली. रुग्णवाहिका असूनही वेळेवर उपचार न झाल्यामुळे एखादा अपघातग्रस्त दगावला तर त्याला कारणीभूत कोण, असा प्रश्न प्रवाशांनी यावेळी विचारला. अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित सावंत पुढील करीत आहेत.