शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डोळवी गावाजवळ अपघातात एक ठार

By admin | Updated: January 1, 2016 23:56 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील डोळवी गावाजवळ वॅगनर व एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वॅगनरमधील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील डोळवी गावाजवळ वॅगनर व एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वॅगनरमधील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.मुंबई-गोवा महामार्गावर १ जानेवारीला रात्री २ वाजण्याच्या सुमारास वडखळकडून नागोठणेकडे जाणारी वॅगनर (एमएच ०६ बीई ७८०१) व नागोठणे बाजूकडून वडखळकडे जाणारी एसटी (एमएच २० बीएल २४७६) यांच्यात डोळवी गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात वॅगनरमधील उदय मोकल (२१, रा. कारावी) हा तरुण जागीच ठार झाला, तर मिथुन मोकल (२०, रा. कारावी) हा गंभीर जखमी झाला असून, जखमीला उपचारासाठी पनवेल येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेला उदय मोकल हा तरु ण क्र ीडा मंडळ कारावी संघाचा कबड्डी खेळाडू होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मोटारसायकल अपघातात दोन जखमीबिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील नडगांवच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास इम्रान इब्राहिम शेख (२६, रा. मुंबई) व त्याचा साथीदार सुरज कनोजीया (२३) हे पल्सर मोटारसायकल (एमएच ०१/ बीई ७७५४) घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता महाड येथील रानडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींना पुढील उपचाराकरिता मुंबई हलविण्यात आले आहे.