शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

रायगडमध्ये दीड लाख मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:04 IST

जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी २९९ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया १५ जानेवारीला पार पडणार आहे. एक लाख ७७ हजार ३८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या ८६ हजार ६३३ आणि पुरुष मतदारांची संख्या ९० हजार ७४८ आणि इतर दोन मतदारांचा समावेश आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.मतदारांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे :- अलिबाग- ग्रामपंचायतींची संख्या-४, यामध्ये स्त्री मतदार चार हजार ४२, पुरुष मतदार चार हजार २४९, इतर ०, असे एकूण मतदार आठ हजार ७३१.

पेण - ग्रामपंचायतींची संख्या ७. यामध्ये स्त्री मतदार पाच हजार ९८५, पुरुष मतदार पाच हजार ८५३, इतर ०, असे एकूण मतदार ११ हजार ८३८.पनवेल- ग्रामपंचायतींची संख्या-२२, यामध्ये स्त्री मतदार २६ हजार ९१, पुरुष मतदार २९ हजार २०५, इतर १, असे एकूण मतदार ५५ हजार २९७.उरण- ग्रामपंचायतींची संख्या-६, यामध्ये स्त्री मतदार १५ हजार ६८८, पुरुष मतदार १५ हजार ६१५, इतर १, असे एकूण मतदार ३१ हजार ३०४.कर्जत- ग्रामपंचायतींची संख्या-८, यामध्ये स्त्री मतदार १० हजार १७०, पुरुष मतदार १० हजार ४२४, इतर ०, असे एकूण मतदार २० हजार ५९४.रोहा- ग्रामपंचायतींची संख्या-२१, यामध्ये स्त्री मतदार १५ हजार ९५९, पुरुष मतदार १६ हजार ८२२, इतर ०, असे एकूण मतदार ३२ हजार ७८१. माणगाव- ग्रामपंचायतींची संख्या-२, यामध्ये स्त्री मतदार चार हजार ७८४, पुरुष मतदार चार हजार ९४१, इतर ०, असे एकूण मतदार नऊ हजार ७२५. महाड- ग्रामपंचायतींची संख्या-३, यामध्ये स्त्री मतदार तीन हजार ४७४, पुरुष मतदार तीन हजार ६३९, इतर ०, असे एकूण मतदार सात हजार ११३.श्रीवर्धन- ग्रामपंचायतींची संख्या-३ स्त्री मतदार दोन हजार ९५५, पुरुष मतदार दोन हजार ८०४, इतर ०, असे एकूण ५ हजार ७५९  मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

म्हसळ्यात २ ग्रामपंचायतीम्हसळा- ग्रामपंचायतींची संख्या-२, यामध्ये स्त्री मतदार एक हजार १९८, पुरुष मतदार एक हजार ११९, इतर ०, असे एकूण मतदार दोन हजार ३१७. अशा एकूण ७८ ग्रामपंचायतींमध्ये स्त्री मतदार ८६ हजार ६३३, पुरुष मतदार ९० हजार ७४८, इतर २, असे एकूण एक लाख ७७ हजार ३८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड