शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागोठण्यात पुन्हा एकदा पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:26 IST

जनजीवन विस्कळीत : चिकणी गावच्या हद्दीत अडकलेले दाम्पत्य बचावले

नागोठणे : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात बुधवारी दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामपंचायत तसेच पोलीस आणि महसूल यंत्रणा पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून असून पूराच्या पाण्याने नागोठणे बाजारपेठ तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता.

मंगळवारी सायंकाळपासून पावसाने उग्र रूप धारण केल्याने अंबा नदीने मध्यरात्रीच्या दरम्यान पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने पहाटे एसटी बसस्थानक, शिवाजी चौक, कोळीवाडा भागात पुराचे पाणी चढण्यास प्रारंभ झाला होता. पावसाचा जोर कायमच राहिल्याने पुराचे पाणी आणखी वेगाने भरण्यास सुरुवात झाल्याने घर तसेच दुकानातील सामानाची हलवाहलवी करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. चिकणी गावच्या हद्दीत हॉटेल गुलमोहरमागे २०० मीटर पाण्यात भगवान जाधव (३०) आणि भारती भगवान जाधव (२०) दोन्ही रा. धोबेवाडी (पाच्छापूर) ता. सुधागड हे दाम्पत्य अडकले असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक ग्रामस्थ साई मोहन राठोड, लोकेश शिवा नायक, चिकणी यांनी पोहत जाऊन रबरी ट्यूबच्या सहाय्याने सुरक्षित पुराच्या पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.कोळीवाड्यात अनेक घरांमध्ये गणपती विराजमान झाले असल्याने अनेकांची धावपळ उडाली. या भागात पाण्याची पातळी दहा फूट इतकी असल्याने ग्रामपंचायतीने सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्याने गणपतीची मूर्ती घरात ठेऊनच त्यांना घराबाहेर पडलावे लागले होते. तर, घराबाहेर पडण्यापूर्वी काहींनी पाण्यात उभे राहूनच आपल्या घरातील बाप्पांची आरती केली. तेथील सुभाष जामकर यांच्या मूर्तीला पुराचे पाणी लागल्याने त्यांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार कविता जाधव यांनी दुपारी स्थानिक महसूल यंत्रणेसह पुराची पाहणी केली. पूरग्रस्तांसाठी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके यांच्या पुढाकारातून नागोठणे ग्रामपंचायतीकडून मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळी पुराचे पाणी चढत असल्याचे कळल्यानंतर येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नितीश पाटील आणि महिला पोलीस प्रतीक्षा गायकवाड यांनी विशेष सहकार्य केल्याने शासकीय यंत्रणांना वेळीच उपाययोजना करण्यात यश मिळाले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला होता. दरम्यान, हवामान खात्याच्या सूचनेनुसार मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंचडॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडMumbaiमुंबई