शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीदारांची रेलचेल; कोट्यवधीची उलाढाल  

By निखिल म्हात्रे | Updated: November 10, 2023 20:10 IST

दिवाळीच्या सणाला रविवारी सुरुवात होणार आहे. धनत्रयोदशी यानंतर रविवारी लक्ष्मीपूजन आणि मंगळवारी, बुधवारी पाडवा, भाऊबीज आहे.

अलिबाग - दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शहरातील विविध प्रकारच्या कपड्यांची दुकाने, सोन्या-चांदीची दुकाने यासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि फटाके खरेदी करण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे.

दिवाळीच्या सणाला रविवारी सुरुवात होणार आहे. धनत्रयोदशी यानंतर रविवारी लक्ष्मीपूजन आणि मंगळवारी, बुधवारी पाडवा, भाऊबीज आहे. सध्या बाजारपेठेतील विविध भागांमध्ये पूजेचे साहित्य, लक्ष्मीच्या मूर्ती, पणती, सजावटीचे साहित्य आणि आकाश कंदीलसह वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग अशा साहित्याच्या खरेदीला सध्या अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. कपड़ा मार्केट, फटाके मार्केट आणि सोन्या चांदीची दुकाने सोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी अशा सर्वच बाजारपेठेमध्ये ग्राहक विविध प्रकारच्या वस्तूंची पाहणी तसेच नोंदणी करुन ठेवत आहेत. पाडवा, भाऊबीजच्या निमित्ताने सोन्या-चांदीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आताच अनेकजण सोन्या- चांदीची मागणी नोंदवून ठेवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे.दरम्यान, मागील आठ ते दहा दिवसांपासून किराणा साहित्यासह रंगरंगोटी, सजावटीचे साहित्य आणि आवश्यक असलेल्या विविध बाबींची खरेदी केली जात आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार व्यापाऱ्यांनी विविध ठिकाणाहून साहित्य मागविले आहे. शेतकरी असो की शहरी भागातील पगारदार यांच्याकडून खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत हा उत्साह अजून वाढण्याची शक्यता आहे.

किराणा साहित्य खरेदीची उलाढालशहरातील किराणा दुकानांमध्ये तसेच बाजारपेठेतील ठोक विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या किराणा साहित्य खरेदीची लगबग सुरु आहे. मागील आठ दिवसांपासून किराणा बाजारपेठेत मात्र ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. याशिवाय स्वीट मार्ट, केटरर्स आणि फराळ साहित्य बनविणाऱ्यांकडून सुद्धा विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ, चिवडा आणि फराळ साहित्य तयार केले जात आहे. त्यामुळे या बाजारपेठेतही ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे.

ग्राहकांच्या पसंदीला उतरणारे विविध प्रकारचे कपडे मुंबई तसेच अहमदाबाद येथून मागविले आहेत. यंदा कपडा साहित्याच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अजून दोन-तीन दिवसात गर्दी वाढेल. - रितेश जैन, व्यापारी.

लक्ष्मीपूजनाची वही, रोजमेळची खरेदी सुरू आहे. लक्ष्मीपूजन वही किमान ३५ रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. रोजमेळ अडीचशे रुपये ते सहाशे रुपयांपर्यंत आहे. धनत्रयोदशीमुळे याची खरेदी सध्या सुरु आहे. - दर्शन शहा, व्यापारी.