शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचारी वसाहतींची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:59 IST

महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. याशिवाय भटके कुत्रे, वराहांचा वावरही वाढला आहे. तसेच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.पनवेलमधील वाल्मीकीनगरच्या बाजूला शासकीय कर्मचारी वसाहत आहे. या ठिकाणी सात इमारतीत एकूण पन्नास सदनिका आहेत. सध्या चाळीस घरांत रहिवासी राहतात. उर्वरित दहा बंद अवस्थेत आहेत. येथे महसूल, पंचायत समिती, शिक्षकांबरोबर विविध विभागांत काम करणारे कर्मचारी राहतात. या इमारतींची अवस्था बिकट आहे. काही इमारतींना तडे गेले आहेत, प्लास्टरसुद्धा निघाले आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गळतीवर पर्याय म्हणून इमारतीवर पत्रा टाकला, परंतु ही उपाययोजना फक्त जुजबी होती. आजही भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्याशिवाय इमारतींच्या आवारात चार ते पाच फूट गवत वाढल्याने श्वापदांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते.साफसफाई होत नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून मलनि:सारण वाहिन्यातुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.