शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिने मासेमारी बंद; बोटी किनाऱ्यावर शाकारल्या

By निखिल म्हात्रे | Updated: June 7, 2024 09:08 IST

अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सून दाखल झाल्याने मासेमारी हंगाम १ जून ते ३१ जुलै असा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारणी केली आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजारांहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी, तर काही बिगर यांत्रिकी आहेत. ३१ मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. आता पुढील दोन महिने या बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दहा महिने मासेमारी व्यवसाय चालतो. मासेमारीतून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.अलिबाग, आक्षी, बोर्ली, रेवदंडा, नवगाव आदी बंदरांवर मासळीचा मोठ्या प्रमाणात लिलाव होतो. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु, अनेकवेळा बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरीदेखील जिल्ह्यातील मच्छिमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत.

जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. तसेच पावसाळ्यात मासळी प्रजनोत्पादन कालावधी असतो. त्यामुळे दोन महिने मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मासेमारी बंदीमुळे मच्छिमारांनी नौका किनारी लावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील काही बंदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून, काही ठिकाणी नांगरण्याचे काम आजही सुरू आहे.जिल्ह्यातील किनाऱ्यांवर मोठ्या होड्या एक महिना अगोदर उभ्या केल्या आहेत. लहान होड्या बंदर किनारी नांगरण्यास आठवड्यापासून सुरूवात झाली आहे. सध्या बोटींवर प्लास्टिक आवरण टाकण्याचे काम सुरू आहे. - विजय गिदी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई

टॅग्स :monsoonमोसमी पाऊस