शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेळास रस्त्यावर लावले धोक्याची सूचना देणारे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:37 IST

श्रीवर्धन येथील बांधकाम विभागाला आली जाग : रस्ता खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

- गणेश प्रभाळे दिघी : आदगाव येथील समुद्रकिनाऱ्यालगत रस्ता खचला आहे. या मार्गावर चार मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता खचण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात होती. याबाबत आदगाव ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्ती व सूचना फलक लावण्याची मागणी होत असताना ‘लोकमत’ ने याकडे लक्ष देत ७ आॅगस्ट रोजी ‘सावधान... पुढे रस्ता खचतोय’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध के लीहोती. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन या मार्गावर धोकादायक सूचना फलक लावण्यात आले आहे.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास- आदगाव मार्गावरील रस्ता खचत असल्याचे दिसत आहे. सध्या सततच्या पडणाºया पावसामुळे या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या रस्त्याला सूचना फलक नसल्याने दिवसा-रात्री प्रवास करतेवेळी वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत होते. काही दिवसांपासून सतत पडणाºया मुसळधार पावसाने व समुद्राच्या जोरदार क्षारयुक्त लाटांमुळे वेळास रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. सध्या जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्यालगत समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आहे. मात्र, तोही पूर्ण मोडकळीस आला आहे.त्यामुळे वेळीच दुरुस्ती करावी व रस्त्यावर धोकादायक सूचना मिळाव्यात, नाही तर आदगावकडे जाणाºया मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्याच खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.येथे धोक्याची सूचना देणारा फलकही नसल्याने वाहनचालकांना अपघाताची शक्यता वर्तविली जात होती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरवाहनचालकांना सावध करण्यासाठी रस्त्याला धोकादायक फलक लावला आहे. वाहन चालकांना रात्रीच्या वेळी इशारा मिळावा अशी मागणी येथील नागरिक करत असताना वेळोवेळी रस्त्याबाबत समस्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करून रिफ्लेक्टर देखील लावण्यात आले आहे. वेळास - आदगाव रस्त्याला सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक फलक लागल्याने वाहन चालकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.