शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या चिमुकल्यांना पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:13 IST

येथे चिमुकल्या बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु या ठिकाणी येणाºया बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जात नसे.

- अजय कदम माथेरान : येथे चिमुकल्या बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु या ठिकाणी येणाºया बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जात नसे. अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली होती. याबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये ४ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पोहचविण्याची जबाबदारी असलेले एकात्मिक बालविकास विभाग खडबडून जागा झाला आणि महिन्यापासून बंद असलेला पोषण आहार १० आॅगस्टपासून सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.२००९ मध्ये माथेरान येथे अंगणवाडी सुरू झाली. शासनाच्या शहरी भागासाठी असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून या अंगणवाड्या चालविण्यात येत असून येथे असणाºया तीन अंगणवाड्यांमध्ये ४५ बालके येत आहेत. त्यांना शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून पोषण आहार दिला जायचा.शासनाच्या बदलत्या धोरणामुळे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या अंगणवाडी केंद्रावर बालकांना मागील जानेवारी महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा पोषण आहार पुरविला जात नव्हता. त्यामुळे अंगणवाडी शाळेत पोहचणाºया बालकांची संख्या रोडावली होती. अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. याची दखल घेत एकात्मिक बालविकास विभागाने माथेरानमधील ओम शांती बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार सुरु केल्याने येथे येणाºया चिमुकल्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.१ ते ७ आॅगस्टचा स्तनपान सप्ताह साजरा करण्यासाठी मी ५ आॅगस्टला माथेरानच्या अंगणवाड्यांना भेट दिली असता वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचली आणि त्वरित याचा पाठपुरावा सुरू केला. बचत गटाला बालकाच्या प्रतिडोई ४ रु. ९२ पैसे दराने पोषण आहार दिला जायचा त्यामध्ये १ रु पयाची वाढ करून ५ रु . ९२ पैसे प्रति डोई दर दिल्यामुळे माथेरानमधील ओम शांती बचत गटाने पोषण आहार पुरविण्यास सुरु वात केली आहे.- साधना पागी, पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास सेवा योजना, रत्नागिरी.माथेरानमधील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार दिला जात नव्हता ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर याची शासनाने तत्काळ दखल घेऊन पोषण आहार सुरू केला आहे, त्यामुळे माथेरानमधील गरिबांची मुले कुपोषित राहणार नाहीत त्यामुळे शासनाचे आणि ‘लोकमत’चे आभार.- कुलदीप जाधव, अध्यक्ष, क्षत्रिय मराठा समाज, माथेरान.