शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By admin | Updated: May 2, 2016 01:10 IST

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील

खोपोली : उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक घेवून संबंधित विभागाला पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे कसे नियोजन करावे याचे निर्देश दिले आहेत. मात्र तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत असून हंडाभर पाणी मिळविण्यासाठी तालुक्यातील काही भागांमध्ये महिलांना वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने पुढील काही दिवसात खालापूरमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खालापूर तालुक्यातील बोरगाव, कुंभिवली, टेंभरी व शिरवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीरगाव ठाकूरवाडी, कुंभिवली कातकरवाडी, खरसुंडी कातकरवाडी, खरसुंडी बौद्धवाडी, कुंभिवली बौद्धवाडी, आंबेमाळवाडी, ढेबेवाडी, बर्गेवाडी आदी ठिकाणी सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानसई आदिवासीवाडी, चिंबोडा ठाकूरवाडी, वावर्ले कातकरवाडी, तीनघर ठाकूरवाडी, बोरगाव सोंडेवाडी, पौद कातकरवाडी या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. खालापूर तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून पुढील महिन्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी डोक्यावर हंडे घेवून लांबून महिलांना पाणी आणावे लागत आहे. प्यायला पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठीही काही किमीची पायपीट करून महिलांना कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. गुरांचेही पाणी नसल्याने हाल होत आहेत. प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी दुर्गम भागातील वाड्या व गावांमध्ये मात्र यंत्रणा पोहचली नसल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त वाड्या व गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही पुढील काही दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना खालापूरकरांना करावा लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)