शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी गावांना नोटिसा

By admin | Updated: April 4, 2016 02:04 IST

सिडको वसाहती, पनवेल नगरपालिका, एमआयडीसी परिसरात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही परिस्थिती फारशी वेगळी नाही.

कळंबोली : सिडको वसाहती, पनवेल नगरपालिका, एमआयडीसी परिसरात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही परिस्थिती फारशी वेगळी नाही.मोर्बे धरणातून नवी मुंबई महानगरपालिका शहराला पाणीपुरवठा करते. त्याचबरोबर कामोठे वसाहतीसह पनवेल तालुक्यातील जलवाहिनीलगतच्या काही गावांना सुध्दा पाणी दिले जाते. गेल्या वर्षी पावसाळ्यात धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मोर्बे धरणातील पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत नवी मुंबई शहराला पुरवायचे मोठे आव्हान नवी मुंबई महापालिकेसमोर आहे. त्यामुळे पाणीकपातीचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. त्यानुसार आदई, विचुंबे, सुकापूर, शिवकर, चिखले याशिवाय काही गावांना सुध्दा पाणी कपात करण्यात आले आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पनवेलमधील काही गावांना नवी मुंबई महापालिकेकडून चार एमएलडी पाणी दिले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मंगळवार आणि शुक्र वार हे दोन दिवस पाणीकपात करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावातील जलकुंभामध्ये पाणी साठवून ते रहिवाशांना पुरवले जात आहे. एकूण 30 टक्के पाणीकपात करण्यात आल्याने ग्रामपंचायती सुध्दा खडबडून जाग्या झाल्या आहेत. त्यांनी पाणीबचतीकरिता पुढाकार घेऊन प्रबोधन आणि जागृती सुरू केली आहे. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन सुध्दा केले आहे. याबाबत आम्ही ग्रामस्थांना सूचना दिल्या असल्याची माहिती विचुंबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जे. सी. चौरकर यांनी दिली. (वार्ताहर)