शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रक नव्हे; देवदूत

By admin | Updated: August 4, 2016 01:25 IST

चालक - वाहकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सतर्क केले. मोहिते हे देवदूत बनले.

सुभाष कदम-- चिपळूण --विधिलिखित कधीही टळत नाही आणि टाळायचे म्हटले तरी टाळता येत नाही. मुंबई - गोवा महामार्गावर सोमवारी मध्यरात्री काळ दबा धरून बसला होता. रात्री ११.३०च्या सुमारास सावित्री नदीला पूर आल्याने राजेवाडी फाट्यावरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. हे वृत्त चिपळूण आगारात वाहतूक नियंत्रक सिध्दार्थ मोहिते यांना समजताच त्यांनी महामार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या चालक - वाहकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सतर्क केले. मोहिते हे या वाहन चालकांसाठी देवदूत बनले. मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर ते महाडदरम्यान राजेवाडी फाटा येथे असलेला ब्रिटिशकालीन पूल पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेला. या पुरात जयगड-मुंबई व राजापूर - बोरिवली या दोन बसेसबरोबर काही खासगी गाड्याही वाहून गेल्याची शक्यता आहे. पुलाशेजारी असणाऱ्या एका गॅरेजच्या कामगाराने ही दुर्घटना पाहिली आणि त्यांनी संपर्क साधला.चिपळूण आगारात रात्री १२ नंतर या घटनेची माहिती मिळाली आणि एकच हलकल्लोळ माजला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यावेळी सिध्दार्थ मोहिते यांनी मन घट्ट केले आणि सर्व चालक - वाहकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. चिपळूणहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांची नोंद चिपळूण आगारात होते. त्यामुळे त्या चालकांशी संपर्क साधणे सोपे झाले, तर मुंबईहून चिपळूणकडे येणाऱ्या अनेक गाड्यांनाही मोहिते यांनी महाडपर्यंत थांबवल्या. मुंबई-चिपळूण ही गाडीही महाड आगारात थांबली होती. जयगड - मुंबई व राजापूर-बोरिवली या दोन गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापूर्वी चिपळूण आगारातून मुंबईकडे गाडी घेऊन गेलेले अरुण सुर्वे हे चालक बालंबाल बचावले. कारण या तिन्ही गाड्या एकाचवेळी धावत होत्या. सुर्वे यांची गाडी पूल पास झाल्यानंतर पाण्याचा लोंढा आला असावा. दोन गाड्या वाहून गेल्याचे समजताच कापसाळ येथील सुर्वे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क झाल्याने ते सुखरुप असल्याचे समजले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा नातेवाईकांना प्रत्यय आला. एकूण ११ गाड्या मोहिते यांनी थांबवल्या. परंतु, बेपत्ता झालेल्या दोन गाड्यांच्या चालक - वाहकांशी सकाळपर्यंत संपर्क होऊ शकला नाही. रात्रीची वेळ होती. त्यातच मुसळधार पाऊस कोसळत होता. नदी नाले आक्राळविक्राळ होऊन तुडुंब भरुन वाहत होते. अशावेळी मोहिते यांनी जे धैर्य दाखवले ते कौतुकास्पद होते. त्यांनी चालक - वाहकांबरोबरच एस. टी.च्या अधिकाऱ्यांशीही तत्काळ संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बुधवारी दुपारी ११ वाजेपर्यंत ते कार्यरत होते.