शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीचे उत्पन्न १४ दिवसांत १ लाख

By admin | Updated: October 24, 2015 01:08 IST

पनवेलकरांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी शहरात एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यात आली. ७५ क्रमांकाच्या या बससेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- वैभव गायकर,  पनवेलपनवेलकरांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी शहरात एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यात आली. ७५ क्रमांकाच्या या बससेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर मार्गावर दिवसातून चार फेऱ्या होतात.पनवेल रेल्वे स्थानकापासून सकाळी ७ वाजून १८ मिनिटांनी पहिली बस सुटते तसेच शेवटची बस रात्री ८ वाजून ३६ मिनिटांनी सुटते. साईनगरमधून पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत येणारी पहिली बस सकाळी ७ वाजता सुटते तर शेवटची बस ८ वाजून ५६ मिनिटांनी सुटते. पहिल्या दिवसापासूनच या बससेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला असून दिवसाला १५00 ते १६00 नागरिक या बसमधून प्रवास करीत आहेत. पहिल्या दिवशी एनएमएमटीला या बससेवेतून ७७४४ रु पयांचे उत्पन्न मिळाले होते त्यात भर होवून हे उत्पन्न १४ हजारांच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे बससेवेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १४ दिवसात एनएमएमटीच्या उत्पन्नात १ लाखाची भर पडली आहे. या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरु करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बसस्थानक , नवीन पनवेल उड्डाणपूल, ठाणा नाका, कफनगर, सारस्वत बँक, तालुका पोलीस स्टेशन, वाल्मीकी नगर, नगरपालिका, दर्गा नाका, लायन गार्डन, काळण समाज हॉल, प्रांत कार्यालय, गुरु पुष्प सोसायटी , साई रत्नदीप सोसायटी, साईनगर आदी मार्गावर ही बस सुरू आहे. रेल्वे प्रवाशांसाठीही ही बससेवा फायद्याची ठरत आहे.मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तसेच नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करू लागले आहेत.प्रवाशांचा चांगला प्रतिसाद या बससेवेला लाभला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पासची सुविधा याठिकाणी सुरू झाली नसली तरी भविष्यात ती देखील सुरू करण्यात येईल.- संतोष पष्टे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक , आसुडगाव आगार एनएमएमटी