शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये १०८ रु ग्णवाहिका बंदमुळे नवजात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:57 IST

महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका तसेच दोन रु ग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र, या रु ग्णवाहिका सेवा सर्वसामान्यांना मिळतीलच याची शाश्वती नाही.

माथेरान : महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका तसेच दोन रु ग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र, या रु ग्णवाहिका सेवा सर्वसामान्यांना मिळतीलच याची शाश्वती नाही. कारण येथील १०८ रुग्णवाहिका सेवा ही गेले कित्येक दिवस बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे येथील एका नवजात बालकास आपला प्राण गमवावा लागला आहे.माथेरान नगरपरिषद बी. जे. हॉस्पिटल येथे २५ आॅक्टोबर रोजी सकाळी प्रसूतीसाठी दोन महिला रु ग्ण आल्या. याठिकाणी दोन्ही महिला रु ग्णांची प्रकृती गंभीर असल्याने माथेरान दवाखान्यात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील डॉक्टरांनी हे रु ग्ण तत्काळ येथून दुसºया दवाखान्यात हलवण्याचा सल्ला दिला होता. परंतु १०८ रु ग्णवाहिका बंद अवस्थेत दवाखान्याच्या आवारातच उभी असल्याने यावेळी डॉ. उदय तांबे यांनी प्रणिता प्रमोद पारटे यांची प्रसूती येथेच करण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात रूपाली कडू ही दुसरी प्रसूतीसाठी महिला रु ग्ण आल्याने डॉक्टरांसह कर्मचाºयांची तारांबळ उडाली. रूपाली कडू यांना तत्काळ येथून हलवण्यासाठी १०८ रु ग्णवाहिकेसाठी कॉल दिला असता कशेळे येथील रु ग्णवाहिका माथेरान येथे पाचारण करण्यात आली. परंतु रस्त्यांची वाताहत व घाट रस्ता असल्याने पावणे दोन तास ही रु ग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने या सर्व प्रकारात भरपूर वेळ गेल्यामुळे रूपाली कडू यांची प्रकृती अजून खालावली. त्यांना तातडीने कशेळे येथून आलेल्या १०८ रु ग्णवाहिकेतून पुढे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु रस्त्यांची दुरवस्था, बंद अवस्थेत असलेल्या रु ग्णवाहिकेमुळे झालेला विलंब तसेच बी. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टर कार्यरत असताना एकाच डॉक्टरची उपलब्धता असल्याने व अपुरा कर्मचारी वर्ग या सर्व प्रकारातून घडलेल्या निष्काळजीपणामुळे रूपाली कडू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या नवजात अर्भकाने हे जग पाहण्याअगोदरच अखेरचा श्वास घेतला.