शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने जातनिहाय गणना व्हावी

By admin | Updated: October 7, 2015 00:11 IST

योग्य प्रकारे जातनिहाय जणगणना न झाल्याने बौद्धधर्मीयांच्या आरक्षणाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ती पुन्हा करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करून तो प्रस्ताव केंद्राकडे

अलिबाग : योग्य प्रकारे जातनिहाय जणगणना न झाल्याने बौद्धधर्मीयांच्या आरक्षणाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ती पुन्हा करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील अनुसूचित जातींचे विविध प्रश्न, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना, राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यामार्फत येणारा निधी, त्याचे होणारे वाटप, याबाबतचा आढावा घेण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा रायगड जिल्ह्यात ५ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत राज्य सरकारने लावला होता.जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना ४६ वाड्यांवर अद्याप पोचलेल्या नाहीत. त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यास प्रशासन कमी पडले असल्याचे मतही समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. इतर योजनांमध्ये काम चांगले असून, ते अधिक चांगले होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा प्रशासनाला केल्या असल्याचे आमदार खाडे यांनी सांगितले.माणगावच्या रायगड शिक्षण संस्थेने साहाय्यक शिक्षक वैशाली शेंडे यांना जातीभेद करीत काढून टाकल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या महिलेला न्याय देण्यासाठी, संस्थेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालकांना निर्देश देण्यात येणार असल्याचेही खाडे यांनी स्पष्ट केले. माणगाव शिक्षण संस्थाचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या अन्यायाचा पाढा वैशाली शेंडे यांनी समितीसमोर वाचला. (प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सध्या राजकारण केले जात आहे. काही पक्ष आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समितीचे सदस्य तथा आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगून, ११ आॅक्टोबरला होणाऱ्या भूमिपूजनाआधी स्मारकाचा आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. रायगड जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना ४६ वाड्यांवर अद्याप पोचलेल्या नाहीत.१) जिल्हा नियोजन फंडातील अनुसूचित जातीसाठीच्या उपाययोजनांतून जिल्ह्यातील मुलांसाठी यूपीएस्सी आणि एमपीएस्सीचे ट्रेनिंग देणारे स्पेशल इन्स्टिट्युट उभारावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला समितीने केल्या आहेत.२) जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या मुलामुलींसाठी शाळा, वसतिगृहही भाड्याने घेतलेली आहेत. ती सरकारने स्वत: बांधावीत, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.३) विधानसभेत अनुसूचित जातीचे ८ आमदार आहेत. ते प्रामुख्याने २८ पाहिजे होते, तर ९ खासदार असावयास पाहिजे असताना प्रत्यक्षात पाचच आहेत. ही विषमता चुकीच्या जातनिहाय जनगणनेमुळे निर्माण झाली आहे. विकासकामांसाठी १३ टक्के निधीअभावी ११ टक्केच मिळाला असल्याचे आ. गजभिये यांनी सांगितले.