शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला मिळाले नवीन पत्र्यांचे शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:58 IST

‘लोकमत’ने ३ जुलैच्या अंकात ‘भर पावसात विद्यार्थी गिरवितात शिक्षणाचे धडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

मोहोपाडा : ‘लोकमत’ने ३ जुलैच्या अंकात ‘भर पावसात विद्यार्थी गिरवितात शिक्षणाचे धडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून झोपलेली शासकीय यंत्रणा जागी झाली. या शाळेत पावसात भिजून धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांनंतर शालेय खोल्यांना नवीन पत्र्याची शेड मिळाल्याने शालेय समितीसह पालक, विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.मोरबे येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेतील पत्रे फुटल्याने गेली दोन वर्षे विद्यार्थी पाण्यात भिजून शिक्षण घेत होते, याकरिता शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा अरुणा नरेश राणे यांनी १९ जुलै २०१८ रोजी खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी व तालुका शिक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करूनही दुर्लक्ष करत होते. शिवाय, मोरबे ग्रामस्थांकडून २८ फेब्रुवारी २०१९ रोजी चौक ग्रामपंचायतीकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आला होता; परंतु संबंधितांकडून वेळकाढूपणा झाल्याने विद्यार्थ्यांना भिजत अभ्यास करावा लागत होता, ही हकिकत पालकांनी सांगितली. या वेळी ‘लोकमत’ने मोरबे शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती, येथील विविध समस्यांना वृत्ताद्वारे समोर आणले. यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय कर्मचाऱ्यांनी शाळेची पाहणी करून दोन्ही वर्गखोल्यांना २० नवीन पत्रे लावून गळती बंद केली. शाळेतील वर्गखोल्यांना नवीन पत्रे मिळाल्याने शिक्षण समितीच्या अध्यक्षा अरुणा राणे, शिक्षक व पालकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.