शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा रोपवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 01:29 IST

सध्या रायगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेला रोपवे जागेच्या वादामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : शिवभक्तांना सुरक्षितपणे किल्ले रायगडावर जाता यावे यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा सुरक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण रोपवे उभारण्याची घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शुक्रवारी महाड येथे केली. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी खा. संभाजीराजे गडावर आले होते. या पाहणीनंतर महाड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.

सध्या रायगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेला रोपवे जागेच्या वादामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब पत्रकारांनी खा. संभाजीराजे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना प्राधिकरणाच्या माध्यमातून नव्या रोपवेसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून हा नवा रोपवे गडाच्या वैभवाला साजेसा असा उभारण्यात येईल, असे खा. संभाजीराजे म्हणाले.

हत्ती तलावाला पुन्हा गळती लागली असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. त्यावर भाष्य करताना, या तलावाची गळती काढण्याचे काम केवळ ६० ते ७० टक्केच झालेले आहे. ज्या भागातील गळती काढण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कोणतीही समस्या नसून, ज्या भागात काम झालेले नाही, त्याच भागात ही समस्या निर्माण झालेली आहे. ते काम आता सुरू करण्यात आलेले आहे. जर काम योग्य पद्धतीने झाले नसते तर हा तलाव पूर्ण भरला नसता. या कामामध्ये एका रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि तो होऊ देणारही नाही, असा विश्वासही खा. संभाजीराजे यांनी दिला.

महाड - रायगड मार्गाचे काम योग्य पद्धतीने न करणाऱ्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेतले आहे. त्याला काळ्या यादीत टाकले असून, नवी निविदा प्रक्रिया सुरू  केल्याची माहितीही खा. संभाजीराजे यांनी दिली. या वेळी शिवराज्याभिषेक संस्थेचे फत्तेसिह सावंत उपस्थित होते.

अकरा कोटींचा निधी पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरितnगडावरील संवर्धन आणि उत्खननाचे काम पुरातत्त्व विभागामार्फत केले जात आहे. या कामासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्रधिकरणाने पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. या गतीने ही कामे पूर्ण होण्यास पंचवीस वर्षे लागतील असे खा. संभाजीराजे म्हणाले.n गावांतील रस्त्यांची कामे जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. सातपुते यांनी दिली.