शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

नवीन नळजोडणीस शहरवासीयांचा विरोध

By admin | Updated: October 1, 2015 23:46 IST

मुरुड नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाने सर्व नळधारकांना नोटीस पाठवून नवीन वितरण लाइनवरुन कनेक्शन घेणे बंधनकारक केल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे.

नांदगाव : मुरुड नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाने सर्व नळधारकांना नोटीस पाठवून नवीन वितरण लाइनवरुन कनेक्शन घेणे बंधनकारक केल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन वितरण लाइनवरुन पाणी घेताना या जोडणीचा खर्च सुमारे चार ते पाच हजार रुपयांपर्यंत होत आहे. तो खर्च नागरिकांना करावयाचा असल्यामुळे याचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागणार आहे. जुन्या वितरण व्यवस्थेकडून सुरळीत पाणीपुरवठा होत असताना नवीन वितरण व्यवस्थेची सक्ती करु नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे.याबाबतचे निवेदन भोगेश्वर आळी उत्तर विभाग येथील नागरिकांनी मुख्याधिकारी वंदना गुळवे यांना दिले. शासनाच्या फंडातून अंबोली धरणांतर्गत मुरुड शहरासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली होती. यासाठी सरकारने ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्ची करुन सुद्धा नवीन जोडणीचा खर्च का? असा प्रश्न या निवेदनाव्दारे मुरु ड नगरपरिषद प्रशासनास नागरिकांनी केला आहे. मुरुड शहरासाठी अंबोली धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यामध्ये धरणापासून ते ग्राहकांपर्यंत पाणी पोहचवण्याचा सर्व खर्च अपेक्षित धरुनच केला आहे. हा खर्च नळधारकांकडून घेणे योग्य आहे का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. भोगेश्वर आळीमध्ये सर्व नळधारक नवीन नळजोडणीस येणारा खर्च करू शकत नाहीत, तरी नगरपरिषदेने स्वखर्चाने नवीन नळजोडणी करुन द्यावी, अशी आग्रही मागणी शहरी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष रहिम कबले व गटनेते महेश भगत यांना देण्यात आले. यावेळी भोगेश्वर पखाडीतील प्रकाश विरकूड, उदय चौलकर, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)