शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन विभागांची स्थलांतरास टाळाटाळ, कर्जत पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:44 IST

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभाग एका इमारतीत यावेत, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी केली गेली. त्या इमारतीत येऊन कारभार हाकण्यास तीन विभाग टाळाटाळ करताना दिसत आहेत.

- विजय मांडकर्जत : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभाग एका इमारतीत यावेत, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी केली गेली. त्या इमारतीत येऊन कारभार हाकण्यास तीन विभाग टाळाटाळ करताना दिसत आहेत. गेले दोन महिने एकात्मिक बालविकास विभाग आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नवीन इमारतीत येण्यास टाळाटाळ करणारी नवीन कारणे शोधत आहेत.कर्जत पंचायत समितीची दुमजली नवीन इमारत फेब्रुवारी २०१७मध्ये बांधून पूर्ण झाली आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या अर्थसाहाय्याने उभ्या राहिलेल्या इमारतीत जुलै २०१७मध्ये प्रत्यक्ष कारभारास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचा भाग असलेल्या दोन विभागांची तीन कार्यालये कर्जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीत येण्यास तयार नाहीत. त्यातील एकात्मिक बालविकास विभागाच्या दोन विभागांपैकी एक विभागाचे कर्मचारी-अधिकाºयांचे काम हे कर्जत टिळकचौकात असलेल्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सुरू आहे. एकात्मिक बालविकास विभागाचे म्हणजे अंगणवाडीशी संबंधित असलेले दुसरे कार्यालय हे मुद्रे भागात सुरू आहे. तेथे जाण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नाही. तसेच ते कार्यालय शोधण्यासही वेळ लागतो. त्याच धोकादायक इमारतीत तालुका आरोग्य अधिकाºयांचे कार्यालयदेखील सुरू आहे.या तिन्ही खात्यांच्या अधिकाºयांनी आपली कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीत हलविण्यास वेगवेगळी कारणे पुढे केली आहेत. मुद्रे येथील अंगणवाडीचे प्रकल्प अधिकाºयांचे कार्यालय भाड्याच्या जागेत भरविले जात, त्यांनी करार संपला नसल्याने नवीन इमारतीत जाण्यास असमर्थता दर्शविली आहे. आरोग्य अधिकारी आणि एकात्मिक बालविकास विभागासाठी कर्जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध असताना त्यांच्याकडून कार्यालये हलविण्यास करण्यात येणारी टाळाटाळ ही कार्यालये एका छत्रात आणण्याच्या प्रक्रि येला विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. आपली कार्यालये नवीन इमारतीत आणा, अशा सूचना गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी पत्रात दिल्या आहेत. कार्यालय न हलविणा-या या तिन्ही विभागांच्या तक्रारी काही स्वयंसेवी संस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल