शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ - माथेरान मिनीट्रेन होतेय सज्ज

By admin | Updated: October 8, 2015 00:01 IST

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पावसाळी सुटीवर असून १५ आॅक्टोबरला ही सुटी संपत आहे. नव्या पर्यटन हंगामासाठी पर्यटकांची लाडकी माथेरान राणी सज्ज होत आहे.

- विजय मांडे,  कर्जतनेरळ-माथेरान मिनी ट्रेन पावसाळी सुटीवर असून १५ आॅक्टोबरला ही सुटी संपत आहे. नव्या पर्यटन हंगामासाठी पर्यटकांची लाडकी माथेरान राणी सज्ज होत आहे. मिनी ट्रेनचे प्रवासी डबे दुरु स्त होऊन येत असताना मात्र मिनी ट्रेनसाठी नवीन इंजिन खरेदीबाबत रेल्वे प्रशासन कोणतेही धोरण स्वीकारत नसल्याने अर्ध्या वाटेवर बंद पडणारे इंजिन हे रडगाणे पुढे सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे.१६ जूनपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन १५ आॅक्टोबरपर्यंत पावसाळी सुटीसाठी म्हणजे दुरुस्तीच्या कामासाठी जात असते. ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक बंद असते. या कालावधीत मिनी ट्रेनचा २१ किलोमीटरचा मार्ग, प्रवासी डबे, इंजिन यांची दुरु स्तीची कामे केली जातात. पुन्हा नव्या दमाने मिनी ट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू करण्यासाठी मिनी ट्रेन सध्या सज्ज होत आहे. त्यासाठी मिनी ट्रेनची जुनी असलेली इंजिने दुरु स्त करून परळ येथून आणण्यात येत आहेत. तर त्याचवेळी प्रवासी डबेदेखील दुरु स्त करून नेरळ लोकोमध्ये दाखल होत आहेत.नवरात्र उत्सव काळात मिनी ट्रेन सुरू होत असल्याने माथेरानकर आणि व्यावसायिक यांच्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. माथेरानचा पर्यटन व्यवसाय हा अनेक दशकांपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनवर अवलंबून आहे. १५ आॅक्टोबरनंतर सुरू होणारा नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा पर्यटन हंगामासाठी नेरळ लोको शेड तयार होत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनसाठी इंजिने ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षाच्या पर्यटन हंगामात नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन दहा - बारा वेळा रु ळावरून घसरून प्रवासी फेरी रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे गेली अनेक वर्षे नवीन इंजिन रेल्वेने खरेदी करावे, अशी मागणी होत आहे. मात्र रेल्वेकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे माथेरानकर आणि पर्यटकांमध्ये नाराजी आहे.चारपैकी दोन रेल्वे इंजिने दार्जिलिंग येथेयेथील सुस्थितीत असलेली चारपैकी दोन इंजिने रेल्वे बोर्डाने दार्जिलिंग येथे तेथील मिनी ट्रेनसाठी ठेवली आहेत. तेथे देखील गेली चार वर्षे एनडीएम ५०१, ५०२ ही दोन्ही इंजिने धूळखात पडून आहेत. ती दोन्ही इंजिने वापरायची नव्हती तर येथून नेली कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.