शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानकरांसह पर्यटकांना प्रतीक्षा नेरळ - माथेरान सेवेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:33 IST

ब्रिटिशांनी वसविलेले व देशातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान नावारूपास आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम ऐन भरात असताना मिनिट्रेन सफारीची पर्यटकांना असलेली ओढ दिसून येत असून नेरळ - माथेरान मिनिट्रेनच्या फेऱ्या बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी बोलून दाखविली.

ब्रिटिशांनी वसविलेले व देशातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान नावारूपास आले आहे. सर आदमजी पिरभोय यांनी स्वखर्चातून सुरू केलेली ही मिनिट्रेन सेवा एका शतकाहून अधिक काळ माथेरानच्या सेवेत अविरत सुरू आहे १९०५ साली मुहूर्तमेढ झालेली ही सेवा अखंड सुरू होती, पण मागील काही वर्षांपासून नेरळ - माथेरान सेवेकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दोन वर्षांपासून ही सेवा पर्यटकांसाठी बंदच आहे. सुरक्षिततेचे कारण देत या मार्गावर रेल्वे प्रशासनाने कोट्यवधी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. पण ही सेवा अजूनही बंदच आहे. ही सेवा केव्हा सुरू होईल याविषयी रेल्वे प्रशासन काहीही बोलत नसल्याने या वर्षीही माथेरानकर नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवेला मुकणार असेच चित्र सध्या दिसत आहे.

नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू राहिल्याचा फायदा येथे येणाऱ्या पर्यटकांना मिळतो. कमी खर्चात थेट गावामध्ये येण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मिनिट्रेनने आल्यास पर्यटकांना दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वारावर फसव्या व्यावसायिकांकडून गावात येण्यासाठी नेहमीच होणाऱ्या वाहतुकीच्या फसवणुकीपासून सुटका तर मिळतेच, पण मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही होत असते. तसेच वाहनकोंडी, वेळेची बचत व अर्ध्या माथेरानचे दर्शन या प्रवासादरम्यान होत असल्याने पर्यटक नेरळ - माथेरान प्रवासास प्राधान्य देत असतात. दिवाळी हंगामात नेरळ - माथेरान सेवा बंद असल्याने येथे आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत असून ही सेवा सुरू असावी, अशी खंत ते बोलून दाखवत आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी  पर्यटकांची मुख्य मागणी ही नेहमीच नेरळ - माथेरान मिनिट्रेनकरिता राहिलेली आहे. दोन ते अडीच तासांच्या या रेल्वे प्रवासात त्यांना खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होता येते. येथे आल्याचे सार्थक वाटते. ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत असून लवकरच याबाबत रेल्वेमंत्र्यांना येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ही मिनिट्रेन किती फायदेशीर आहे याबाबत भेट घेऊन नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू करण्यासाठी आमच्या शिष्टमंडळामार्फत निवेदन देणार आहोत, असे नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.

लहानपणी शाळेतून सहलीला आलो असतानाच्या मिनिट्रेन सफरीच्या आठवणी आजही ताज्या आहेत, म्हणून मुलांना घेऊन पुन्हा माथेरानला आलो असता नेरळ - माथेरान मिनिट्रेन बंद असल्याचे पाहून वाईट वाटले.- जिग्नेश पटेल, पर्यटक, गुजरात

महाराष्ट्रात मिनिट्रेन रेल्वे सुरू असलेले माथेरान हे एकमेव ठिकाण असल्याने कुटुंबासह तिच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी आलो असता नेरळ - माथेरान सेवा बंद असल्याचे समजले. त्यामुळे नेरळ ते माथेरान हा प्रवास करताना किती खर्चीक आहे हे लक्षात आले. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांसाठी ही सेवा अखंड सुरू राहायला हवी.- संजोग जाधव, पर्यटक, वसई 

टॅग्स :Matheranमाथेरान