शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-कळंब जिल्हा मार्ग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:37 IST

रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता

नेरळ : नेरळ-कळंब जिल्हा मार्गावरील बिरदोले गावाजवळ बुधवारी सकाळी अचानक रस्ता खचला आहे. या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून, येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नसल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधानपणे वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिक व नेरळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर बिरदोले गावाजवळ असणारी मोरी खचून पूर्ण रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमीन खचली असल्याचे बोलले जात आहे. नेरळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत असून, अनेक प्रवाशांना सूचना देत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावरील हा खचलेला भाग लवकरात लवकर चांगला करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या या रस्त्यावरून दुचाकी जात असल्या तरी चारचाकी वाहने जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मराठा मोर्चामुळे ठेकेदारांनीही काम बंद केले आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यासाठी माणसे मिळत नाही. त्यामुळे लवकरच या रस्त्यावरील खचलेला भाग भरण्यात येईल आणि रस्ता चांगला करण्यात येईल.- आर. एम. वेलदोडे, शाखाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागनेरळ-कळंब रस्ता बिरदोले गावाजवळ मध्यभागी खचला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. आमच्याकडून वाहनचालकांना वाहने सावधानपणे चालवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.- मदन पाटील, वाहतूक पोलीस, नेरळ

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड