शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

कुपोषणावर मात करण्यासाठी एकत्र कामाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:37 IST

लोकशाहीमधील सर्वात मोठा देश आपला आहे, अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे,

कर्जत : लोकशाहीमधील सर्वात मोठा देश आपला आहे, अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे, मुंबईजवळील कर्जत तालुक्यात कुपोषित मुले सापडतात, हा कुपोषण शब्द आपल्याला कमीपणाचे लक्षण आहे, शासन खूप उपाययोजना करीत आहे, आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा सुरू केल्या आहेत, कुपोषणावर मात करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुरेश लाड यांनी बाल उपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांच्या विशेष प्रयत्नातून, दिशा केंद्राच्या पोषण हक्क गटाच्या वतीने सततच्या केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा विकास योजना (डीपीसी)मधून कर्जत तालुक्यासाठी बालविकास केंद्र चालवण्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. बुधवार, १८ सप्टेंबर रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे बालउपचार केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त शल्य चिकित्सक प्रमोद गवई, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. जयश्री म्हात्रे, डॉ. लक्ष्मीकांत तलवारे, डॉ. रामकृष्ण पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आदी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात कशेळे ग्रामीण रुग्णालय येथेसुद्धा उपचार आणि आरोग्य सेवा देण्याचे नियोजन करावे अशा सूचना आमदार सुरेश लाड यांनी केल्या. या वेळी एस. एस. तांबे, संगीता भगत, आदीसह अंगणवाडी सेविका, पालक उपस्थित होते.>२१४ कु पोषित बालकेतालुक्यात तीव्र कुपोषित श्रेणीतील ४५ बालके, मध्यम तीव्र कुपोषित श्रेणीतील १६९ बालके अशी तालुक्यात २१४ बालके आहेत. त्यामध्ये तीव्र कुपोषित श्रेणीतील ४५ बालकांना उपचार केंद्रात उपचार दिले जाणार आहेत. तीव्र कुपोषित श्रेणीतील ११ मुले पहिल्या टप्प्यात या बाल उपचार केंद्रात दाखल करून या मुलांना आरोग्य व पोषण सेवा मोफत दिली जाणार आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज बनसोडे यांच्यामार्फत मुलांवर उपचार केले जाणार आहेत.>उपचार घेणाºया मुलांच्या पालकांना मिळणार बुडीत मजुरीउपजिल्हा रुग्णालयात सुरू होणाºया बाल उपचार केंद्रात अ‍ॅडमिट केलेल्या मुलांसह त्यांच्यासोबत येणाºया एका पालकास मोफत भोजन व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. २१ दिवस उपचार केंद्रामध्ये उपचार घेण्यात येणाºया पालकांना प्रति दिन १०० रुपये याप्रमाणे बुडीत मजुरी देण्यात येणार आहे. पालकांनी मुलांसोबत येताना स्वत:चे बँक अकाउंट व आधार कार्ड सोबत आणावे अशा सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी दिल्या आहेत. पोषण सेवावर देखरेख प्रकल्प कर्जतचे समन्वयक म्हणून अशोक जंगले काम पाहणार आहेत.