शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीची सरशीलोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 07:06 IST

श्रीवर्धन तालुक्यामध्ये दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये १४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यामध्ये दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये १४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर सोमवारी घेण्यात आलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये शेखाडी ग्रा.पं.चा अनुसूचित जमातीचा उमेदवारामुळे सरपंचपद रिक्त तर कुडगाव येथे गावाने नेमून दिलेला सरपंच बिनविरोध करण्यात आला. ५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीपैकी दिवेआगर, वाळवटी, रानवली, सायगाव या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने यश मिळविले, तर शिवसेनेने साखरेणे या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीवर ११ पैकी १० जागांवर यश  मिळविता आले, तेथील शिवसेनेला एकच जागा जिंकता आली.साखरोणे ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये जागृती चालके २३० मते (शिवसेना) विजयी झाले. त्याचप्रमाणे वाळवटी ग्रामपंचायत रजिवाना घरटकर ६५४ मते (राष्ट्रवादी) विजयी, सायगाव ग्रामपंचायत लीलाधर रिकामे ४५८ मते ( शेकाप राष्ट्रवादी आघाडी ) विजयी, रानवली ग्रामपंचायत सेजल गजमल २५९ मते (राष्ट्रवादी) विजयी, दिवेआगर ग्रामपंचायत उदय बापट ९२२ मते (राष्ट्रवादी) विजयी झाले. कुडगाव ग्रामपंचायतीसाठी गावाने नेमून दिलेल्या प्रमिला विनोद मेंदाडकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तर वाळवटी शेखाडी ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती आरक्षण असल्याने व येथे सरपंचपदासाठी सदर प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे तर यापूर्वी ७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सर्वे, कुडकी, वांजळे, चिखलप, जसवली, मेघरे, गुळधे चा समावेश  आहे.दिवेआगर ग्रामपंचायतीच्या एकूण ११ सदस्यपदाच्या जागांपैकी १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना पक्षाची यामध्ये मोठी पिछेहाट झाली असून त्यांना फक्त एकाच जागेवर यश मिळविता आले. दिवेआगरप्रमाणे रानवली ग्रामपंचायत देखील तालुक्यातील निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ग्रामपंचायत होती, यामध्ये सरपंच पदासाठी चुरशीची लढाई होती. यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शेजल शैलेंद्र जाधव यांनी बाजी मारली.