शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पदवाटपावरून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:33 IST

अलिबाग : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पदवाटपावरून मंगळवारी चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान न दिल्याने ते संतप्त झाले होते. मात्र भगत यांचे बंधू तथा वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांनीच ...

अलिबाग : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पदवाटपावरून मंगळवारी चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान न दिल्याने ते संतप्त झाले होते. मात्र भगत यांचे बंधू तथा वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांनीच थळे यांच्या नावाला आक्षेप घेतल्याने विकोपाला गेलेला वाद काही क्षणातच मावळला.अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नव्याने पदाधिकारी नेमायचे होेते, तर काहींना बढती मिळणार होती. मनोज धुमाळ यांनी अलिबाग तालुक्यासाठी तीन नवीन तालुकाध्यक्ष नेमले. त्यामध्ये सुनील गुरव, सचिन धुमाळ आणि दिगंबर गायकवाड यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी सरचिटणीसपदी उमेश पाटील, चिटणीसपदी संदीप ठाकूर, समीर म्हात्रे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. अलिबाग तालुका समन्वयकपदी हेमनाथ खरसंबळे यांना पुन्हा संधी देण्यात आली, तर लवेश नाईक यांची अलिबाग तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. थळ विभाग अध्यक्षपदी मनीष पाटील, मापगाव विभाग अध्यक्ष विजय कडवे, कुर्डूस मुरलीधर पाटील, चौल-रेवदंडा महेश कवळे, रामराज संतोष म्हात्रे, शहापूर जनार्दन मोकल यांची विभाग अध्यक्षपदी नेमणूक केली. चेंढरे विभाग अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांचे समर्थक मनोज शिर्के यांचे नाव धुमाळ यांनी जाहीर केले. या पदावर आधी ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे होते. त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवावी, अशी भगत यांची इच्छा होती. मात्र, तालुकाध्यक्षांनी जाणूनबुजून थळे यांच्या नावावर काट मारल्याची धारणा भगत यांची झाली. थळे हे सक्रि य नाहीत, त्यांनी कोणत्याही निवडणुकीत पक्षाचे काम केले नसल्याचा आक्षेप दत्ता ढवळे यांनी घेत शिर्के हे काम करतात त्यांच्या निवडीने पक्षाला फायदा होईल अशी बाजू मांडली. त्यानंतर वाद चांगलाच विकोपाला गेला. शाब्दिक चकमकीत कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर वाडगावचे सरपंच तथा जिल्हा संघटक ऋ षिकांत भगत यांचे बंधू जयेंद्र भगत यांनी थळे यांच्याच नावाला आक्षेप घेतला. थळे हे पक्ष विरोधी कारवाया करीत असल्याचे बैठकीत सांगितले.तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाºयांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्याला काही पदाधिकाºयांचा आक्षेप होता. आता तो दूर झाला आहे. सर्वांनी संघटित होऊन पक्षाचे काम करणे गरजेचे आहे.- मनोज धुमाळ,अलिबाग तालुकाध्यक्षपक्षातील बैठकीमध्ये निवडीबाबत असे घडतेच. त्यामध्ये विशेष असे काहीच नाही. तालुकाध्यक्षांनी पदाधिकाºयांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.- ऋषिकांत भगत, जिल्हा संघटक