शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक

By admin | Updated: July 13, 2016 02:04 IST

दोन गटांत ठेकेदारी घेण्यावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वरचा धाक दाखवत हनिफ दुदुके व अन्य व्यक्तींना मारहाण करूनखोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली साडेतीन

खालापूर : दोन गटांत ठेकेदारी घेण्यावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वरचा धाक दाखवत हनिफ दुदुके व अन्य व्यक्तींना मारहाण करूनखोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली साडेतीन महिने फरार असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी गजाआड केले आहे. २९ मार्च २०१६ रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत पाली फाटा येथे सुरू असलेल्या साइटवर ठेका घेण्यावरून राष्ट्रवादीचा नेता मुख्त्यार धनसे व त्याच्या साथीदारांनी राडा केला होता. मुख्त्यार धनसे हा त्याच्या कारमधून कामाच्या ठिकाणी आला. त्याच्यासोबत आणखी एक कार, एक क्वॉलिस व १० दुचाकींवर काही तरुण आले. मटेरिअल सप्लायचा ठेका मला दे, दोन्ही कामे मीच करणार, असे म्हणून मुख्त्यार धनसे याने हनिफ यास दमदाटी करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याची तक्र ार हनिफ दुदुके यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तक्र ार दाखल झाल्यानंतर मुख्त्यार धनसे फरार होता. दरम्यान त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळला होता. त्यामुळे धनसे याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही ७ जुलै रोजी त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर सोमवारी रात्री खोपोली पोलिसांनी मुख्त्यार धनसे याला अटक केली आहे. यातील नियाज इस्माइल खोत व तौफिक निजद कर्जीकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, अजिज धनसे फरार आहे. मनोहर बैसाने, मुदस्सर कर्जीकर, नुजफर कर्जीकर, संदीप बोर्ले व सागर पवार या आरोपींना जामीन झाला आहे. या राड्यानंतर खालापूरमध्ये खळबळ उडाली होती. फिर्यादी हनिफ दुदुके शेकापक्षाचे कार्यकर्ते असून, आ. जयंत पाटील यांनी या प्रकरणी उन्हाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. (वार्ताहर)