कर्जत : तहसील कार्यालयात वकीलांची केसच्या संदर्भात नेहमीच ये - जा असते. मात्र शुक्रवारी चक्क महसुल नायब तहसीलदार व कर्जतमधील वकील यांच्यातच बाचाबाच झाली आणि प्रकरण धक्का बुक्कीवर गेले. कर्जत तहसील कार्यालयात नव्याने हजर झालेले महसुल नायब तहसीलदार आदिक पाटील यांनी कर्जतमधील ज्येष्ठ वकील चंपालाल तथा सी. बी. ओसवाल यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे वकील वर्गात नाराजी असून पाटील यांच्या निलंबनाची मागणी होत आहे. शुक्रवारी दुपारी अॅड. सी. बी. ओसवाल कामानिमित्त कर्जत तहसिल कार्यालयात गेले असता महसुल नायब तहसीलदार आदिक पाटील यांनी त्यांना धक्काबुकी केली. याबाबत कर्जतचे प्रांत अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी नायब तहसीलदार पाटील यांना चौकशीसाठी बोलावले असता, ही घटना अनवधानाने घडली असून याबाबत खेद असल्याचे सांगितले.
नायब तहसीलदारांची वकिलाला धक्काबुक्की
By admin | Updated: September 5, 2015 22:59 IST