शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू

By admin | Updated: October 1, 2016 02:59 IST

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, यंदा जिल्ह्यात १ हजार १३७ सार्वजनिक तर १७७ घरगुती अशा एकूण १ हजार ३१४ ठिकाणी देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

- जयंत धुळप, अलिबागअश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, यंदा जिल्ह्यात १ हजार १३७ सार्वजनिक तर १७७ घरगुती अशा एकूण १ हजार ३१४ ठिकाणी देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पारंपरिक घट स्थापनेला नवरात्रोत्सवात अनन्य साधारण महत्त्व असते. १६९ सार्वजनिक तर १,२०२ खासगी अशा एकूण १ हजार ३७१ ठिकाणी घटस्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ६०० सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे.नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता रायगड पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात नियमित पोलीस दलास सहाय्य करण्याकरिता राज्य राखीव दलाचे १०० जवान, दंगल नियंत्रणाकरिता विशेष चार पथके, स्ट्रायकिंग फोर्सची सहा पथके, ३०० पुरुष तर १०० महिला असे ४०० गृहरक्षक दलाचे जवान असा चोख पोलीस बंदोबस्त शुक्रवारपासूनच तैनात करण्यात आला आहे.नवरात्रीत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ असतो. गावदेवी मंदिरे अथवा अन्य देवीच्या मंदिरांमध्येही घटस्थापना केली जाते. नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. अलिबागची ग्रामदेवता असणाऱ्या आंग्रेकालीन काळंबामाता मंदिरात घटस्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात यात्रा देखील भरते. अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्यातील काळंबा माता, हिराकोट तलाव किनाऱ्यावरील श्री राजराजेश्वरी देवी, कुलाबा किल्ल्यातील भवानी, वरसोली गावातील भवानी या मंदिरांसह जिल्ह्यात देवीच्या ६०० मंदिरांमध्ये घटस्थापना होणार आहे. नवचंडी होमनवरात्रोत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, कल्याण करणारी आहे. या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते. ही शक्ती देवता देशभरात विविध नावांनी ओळखली जाते. नवव्या दिवशी नवचंडी होम करण्यात येतो. या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. मुलींना आवडणारा हादगा (भोंडला) हा सुद्धा याच दिवसात करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याच्या भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.अकरा दिवस धूमपेण : घटस्थापना अर्थात आद्यशक्तीच्या शक्तीपूजेला उद्यापासून थाटात प्रारंभ होत आहे. गावोगावच्या ग्रामदेवता व कुलदैवतांच्या मंदिरांच्या ठिकाणी सारे आप्तजन कुळाचार सांभाळण्यासाठी ग्रामदेवता व कुलदेवतांच्या देवळांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे ग्राम संस्कृतीमध्ये पहावयास मिळतात. ग्रामदेवतांच्या जोडीने कुलदेवांची मंदिरे गावोगावी नव्याने उभारली गेली. आदिवासी वाडीत उत्सवतळा : गणेशोत्सव संपला नाही तर सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वेध सुरू होतात. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. तळा तालुक्यात ३० सार्वजनिक तर ५ ठिकाणी खाजगी असा ३५ ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यात तारणे पिटसई शेनाटे यांच्या सारख्या आदिवासी वाड्यांवर उत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवास प्रारंभनागोठणे : शिहू येथील श्री बहिरेश्वर मंदिरात अंबा माता, बहिरेश्वर, जोगेश्वरीमाता या देवतांची घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. दसऱ्यापर्यंत भजन, कीर्तन, नृत्य स्पर्धा, महिलांसाठी खेळ, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.