शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

नवघर गाव ते मर्क्स कंपनी रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:11 IST

कारवाईची मागणी; सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा

उरण : ग्रामस्थांच्या मोर्चानंतर सिडकोने नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानच्या सुरू करण्यात आलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम ठेके दाराकडूून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याला पाठीशी घालणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांवर सात दिवसांत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.सिडकोच्या अखत्यारित असलेल्या नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानच्या रस्त्याची पार चाळण झाली आहे. दुरुस्तीअभावी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे धोकादायक ठरत चाललेल्या या रस्त्यावरून कामगार, वाहनचालक यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा नादुरुस्त झालेला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीनेसिडकोकडे सातत्याने केली होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या मागणीला सिडकोच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा नादुरुस्त झालेला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी उरण येथील सिडकोच्या कार्यालयावर २० फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता.ग्रामस्थांच्या मोर्चानंतर सिडकोने नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा रस्ता १५ दिवसांत दुरुस्त करून देण्याचे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता बी. बी. साळवे यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार रस्ता दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र, ठेके दाराकडूूून रस्ता दुरुस्तीचे करण्यात येत असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.जनतेचा पैसा निकृष्ट दर्जाचे काम करून वाया घालविणाºया अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून आणि त्याला पाठीशी घालणाºया सिडकोच्या अधिकाºयांवर सात दिवसांत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.