शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पनवेलमध्ये १६२ गावांना ‘निसर्ग’चा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 00:38 IST

शासनाच्या मदतीची प्रतीक्षा : पावसाळ्याच्या तोंडावर नुकसानग्रस्त घरांच्या दुरुस्तीसाठी धावपळ

वैभव गायकर ।

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र असलेल्या रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातदेखील या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे तालुक्यातील सुमारे १६२ गावे व आदिवासी वाड्यांमध्ये नुकसान झाले आहे.महसूल विभागामार्फत गावनिहाय तलाठी तसेच ग्रामसेवकांमार्फत झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. तालुक्यात एकूण १९५० घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तर अनेक घरांची छते उडाली आहेत.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे अस्मानी संकट कोसळल्याने अनेक ग्रामस्थ व आदिवासी बांधवांची घरांच्या दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये नुकतीच मोकळीक मिळाली आहे. मात्र घरांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पत्रे, कौले मिळत नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत. घरांची दुरुस्ती सुरू असताना पावसाला सुरुवात झाल्यास पुन्हा एकदा अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. दोन ते तीन दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली.

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाउस आहेत. मुंबई उपनगरातील बड्या हस्ती तसेच धनाढ्यांचे हे फार्महाउस आहेत. या फार्महाउसनादेखील मोठा फटका बसला आहे. जवळजवळ ५०० फार्महाउसना निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. अनेक फार्महाउसमधील झाडे कोसळली आहेत तर अनेक फार्महाउसची छते उडाली आहेत. शहरी भागातील मोठमोठ्या इमारतींवरील वेदर शेड (पत्रे ) जोरदार वादळामुळे उडाली आहे.तालुक्यात ३५० विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा दोन दिवस खंडित झाला होता. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र महावितरणचेदेखील मोठे नुकसान यामुळे झाले आहे. ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याच्या अंतिम अहवालात नुकसान झालेल्या विविध भागांची खरी आकडेवारी समोर येईलच.१६२ गावांना निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. यामध्ये आदिवासी वाड्यांचादेखील समावेश आहे. या नुकसानग्रस्त ठिकाणांचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत सुरू आहेत. दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील.- अमित सानप, तहसीलदार, पनवेल५०० फार्महाउसना फटका१पनवेल तालुक्यात नेरे, मालडुंगी, वाजे, कर्नाळा परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाउस आहेत. मुंबई-उपनगरातील बड्या हस्ती, धनाढ्यांचे सेकंड होम म्हणून हे फार्महाउस आहेत. या फार्महाउसनादेखील निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक फार्महाउसमधील झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच मोठ्या फार्महाउसेसची छते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली आहेत.लवकरात लवकर मदतीची गरज२लॉकडाऊनच्या काळात मागील तीन महिन्यांपासून घरीच बसल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. अशा परिस्थितीत निसर्ग वादळाच्या फटाक्यामुळे घरे दुरुस्तीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल