शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये नैसर्गिक नाला बंद !

By admin | Updated: February 1, 2016 01:39 IST

नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे.

कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे. बंद झालेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी लोकवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. घरादारात पावसाचे पाणी जाण्याच्या भीतीने पाडा ग्रामस्थ हवालदिल झाले असून त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे नैसर्गिक नाला पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. माथेरानकडे जाणारी मिनीट्रेन नेरळच्या पाडा भागातून जात असताना स्वामी कंपनीजवळ असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत असते.पूर्वीपासून वाहत असलेल्या त्या नाल्याचा मार्ग लक्षात घेऊ न रेल्वेने मिनीट्रेन मार्गावर पूल तयार केला आहे, तो पूल शंभर वर्षांपूर्वीचा आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेची मेन लाइन याच भागातून जाते. त्याठिकाणी देखील रेल्वे प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधला आहे. अशी सर्व स्थिती असताना स्वामी कंपनी परिसरात गेली काही वर्षे इमारती बांधल्या जात असून तेथील जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्याचा घाट घातला आहे.या नैसर्गिक नाल्याला एवढे प्रचंड पाणी असते की पावसाळ्यात तो नाला कोणालाही ओलांडून जाता येत नाही. त्या नैसर्गिक नाल्यामुळे खरे तर नेरळ पाडा ग्रामस्थ पावसाच्या दिवसात निर्धास्त असतात. मात्र तेथील जमीन विकसित करीत बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्यासाठी अनेक वेळा नाल्यात बांधकाम केले आहे. आतापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीने तब्बल दोन वेळा नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेले बांधकाम तोडून टाकण्याची कार्यवाही केली आहे. मात्र आता संपूर्ण नाला आपल्या जागेत असल्याच्या अविर्भावात त्या बिल्डरने मातीचा भराव करून काटेरी कुंपण टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेला भराव आणि त्यामुळे बंद झालेला नाला यामुळे पावसाचे पाणी परिसरात कुठेही जाऊ शकते, त्याचवेळी नाल्याच्या आसपास असलेल्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन पाडा भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे धाव घेतली असून नैसर्गिक नाला पुन्हा खुला करून देण्याची मागणी केली आहे. येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी नेरळ ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून नैसर्गिक नाला मोकळा करून देण्याची मागणी केली आहे. त्या निवेदनावर ग्रामस्थ भावेश दळवी, वैभव ठाकूर, सुनील चंचे, अशोक चंचे, सुनील कराळे, नीलेश शिनारे, प्रदीप जोशी, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत. याच भागात नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री कोकाटे, सदस्य सन्नी चंचे यांचे वास्तव्य आहे, त्यामुळे बंद झालेला नैसर्गिक नाला लवकर खुला होईल अशी सर्व नागरिकांना खात्री आहे.(वार्ताहर)