शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:12 IST

युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते.

- जयंत धुळपअलिबाग : युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते. त्याद्वारे युवाशक्ती मोठे कार्य उभे करत असते, हे रायगड जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६११ युवती आणि ४०० युवक अशा एकूण १ हजार ११ स्वयंसेवकांनी अथक कष्ट करून तब्बल दहा वनराई बंधारे बांधून सिद्ध करून दाखविले आहे. यामध्ये युवती आघाडीवर होत्या, हे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. परिणामी, यंदाच्या राष्ट्रीय युवक दिनी या सर्व युवक -युवतींच्या मनात जलसंवर्धनाच्या राष्ट्रीय प्रयत्नात आम्हीही कमी नाही, अशी समाधानाची आणि गर्वाची भावना आहे.शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्र मापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढत आहे. त्यास युवा पिढीचा सकारात्म प्रतिसाद लाभत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याची भावना राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. एम. एन. वाणी यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील पाणीसमस्येवर उपाययोजना करण्याकरिता आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, अशा हेतूने जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाºयांच्या बैठकीत वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठानेही वनराई बंधारे उपक्रमास प्राधान्य दिले आहे. अलिबागच्या जेएसएम कॉलेजची ५० मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी अलिबाग जवळच्या मानिभुते येथे, उरण येथील केडी उरण कॉलेजच्या २३ मुले आणि २६ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी उरण तालुक्यातील पिरकोन येथे, सीकेटी कॉलेज(नवीन पनवेल)ची २५ मुले आणि ९३ मुली, अशा एकूण ११८ एनएसएस स्वयंसेवकांनी पनवेल तालुक्यातील नेरे येथील आदिवासी आश्रमशाळे जवळच्या नदीत, पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या ३२ मुले आणि ५२ मुली, अशा एकूण ८४ एनएसएस स्वयंसेवकांनी पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे, मुरुडच्या वसंतराव नाईक कॉलेजच्या ३६ मुले आणि ६६ मुली, अशा एकूण १०२ एनएसएस स्वयंसेवकांनी मुरुड जवळच्या तेलवडे गावात, पाली-सुधागड येथील जे.एन.पालीवाला कॉलेजची ४६ मुले आणि १०५ मुली, अशा एकूण १५१ एनएसएस स्वयंसेवकांनी सिद्धेश्वर गावी, रोहा येथील को.ए.सो. देशमुख-ताम्हाणे कॉलेजची ५४ मुले आणि ९९ मुली, अशा एकूण १५३ एनएसएस स्वयंसेवकांनी भागिरती खार येथे, तळा येथील दत्ताजीराव तटकरे कॉलेजची ५५ मुले आणि ५१ मुली, अशा एकूण १०६ एनएसएस स्वयंसेवकांनी खैराट गावी, तळा येथीलच वेदक कॉलेजची ४६ मुले आणि ३१ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी भागकोंड येथे तर किहिम-चोंढी येथील एलएसपीएम कॉलेजची ३३ मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी आवास येथे वनराई बंधारे बांधले आहेत.दहा लाख गॅलन पाणी अडविलेया सर्व दहा वनराई बंधा-यांच्या माध्यमातून सुमारे दहा लाख गॅलन पाणी अडविण्यात यश आले आहे. अडवलेले पाणी जमिनीत मुरून बंधाºयांच्या परिसरातील भूजलपातळीत येत्या काळात वाढ होणे अपेक्षित आहे, तर विहिरींच्या पातळीत यंदा लवकर घट होणार नाही, असा अंदाज स्थानिक जाणकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.महाविद्यालयीन विश्वातील विधायक युवा चळवळडॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६च्या दरम्यान केली होती. १९६७मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसी सोबत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) असावी, हे मान्य झाले. त्यानंतर झालेल्या कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाचे शिक्षणमंत्री व्ही. के. आर.व्ही. राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील सर्व विद्यापीठांतील सर्व महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले असून, राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन विश्वातील मोठी विधायक युवा चळवळ बनली आहे.

टॅग्स :Raigadरायगड