शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेला पनवेलमध्ये सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:50 IST

२० वर्षांनंतर आयोजित स्पर्धेत महिला-पुरुष स्पर्धकांचा समावेश

पनवेल : पनवेलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेला शुक्रवारी पळस्पे उड्डाणपूल येथून सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. कोरोनामुळे या स्पर्धेचा भव्य उद्‌घाटन सोहळा टाळून साध्या पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. २० वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा पनवेलसह संपूर्ण मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली.आज पाच गटांत ही स्पर्धा पार पडली. यामध्ये १४ वयोगट, १६ वयोगट, १८ वयोगटासह महिला व पुरुष, अशा पाच गटांनी १० कि.मी., २० कि.मी. ते ४० कि.मी.पर्यंत स्पर्धकांनी सायकल चालविली. प्रत्येक गटात २० ते २५ स्पर्धक सहभागी झाले होते. सर्वांत वेगात टार्गेट पूर्ण केलेल्या स्पर्धकांना निवडण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, आसाम, चंदीगड, पंजाब, राजस्थान आदींसह वेगवगेळ्या ठिकाणांवरून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था इंडिया बुल्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांची निवड इंडिया टीम सायकलिंग रेसिंगमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र सोनी यांनी दिली. आंतराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू  राजेंद्र सोनी     यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन दि.५ ते ८ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई मध्ये १९९० पूर्वी अशा प्रकारची स्पर्धा भरविण्यात आली होती.  सोनी स्पिन यांच्या पुढाकाराने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन यांनी या  स्पर्धेचे आयोजन केले आहे.  नवी मुंबई पोलीस, पनवेल पालिका, मुंबई पालिका, नवी मुंबई पालिका, सिडको महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, वातावरण फाउंडेशन, भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड, रामशेठ ठाकूर स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स आदींचा    प्रायोजकांमध्ये समावेश आहे.