शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये नालेसफाई सुरू

By admin | Updated: May 1, 2016 02:36 IST

पेण शहरातील भोगावती नदी पात्राला पडलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य गटारांमध्ये मिसळते. त्यामुळे शहराती

पेण : पेण शहरातील भोगावती नदी पात्राला पडलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य गटारांमध्ये मिसळते. त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होत नसल्याचे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. शहरातील खोलगट भागात पाणी तुंबते. त्यामुळे पेण शहरातील उत्कर्ष नगर कोंबडपाडा, नदीमाळ नाका, कोळीवाडा, म्हाडा वसाहत व झी गार्डन येथे मान्सून आगमनापूर्वीच नालेसफाईच्या काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे स्थानकापासूनच्या मेन ड्रेनेजपासून स्वच्छता व आरोग्य विभागाने सफाई करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी २ मे पासून प्रारंभ होणारा नालेसफाईचा कार्यक्रम मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या आदेशाने या वर्षी चार दिवस अगोदरच घेतला आहे.पेण शहराचे वेगाने वाढणारे नागरिकीकरण व शहराची मान्सूनपूर्व स्वच्छता व नालेसफाईचा धडक कार्यक्रम मे महिन्याच्या आतापर्यंत चालणार आहे. पेण - बोरगाव, उत्कर्षनगर व इतर चिंचवाडा परिसरात मोठ्याने नागरीवसाहती उभ्या रहात आहेत. बोरगाव रस्त्याच्या दुतर्फा झालेले नवीन वसाहतीचे भराव व शेजारी असलेले भोगावती नदीतटाचे पात्र, पावसाळी धोकादायक बनून नदीयात्राचे पाणी वेगाने उष्कर्षनगर परिसरात घुसते या ठिकाणी असलेल्या नाल्याची सफाई व पश्चिमेकडील रेल्वे स्थानक बाजूकडील नालेसफाई ही मान्सूनपूर्व करण्यावर पालिकेचा अधिक भर असतो. हे दोन मेन ड्रेनेजची लांबी अनुक्रमे १५० मीटर व १९७ मीटर आहे. नदीपात्र जेव्हा पुरसदृश रुप धारण करते तेव्हा मेन ड्रेनजमधून साडवा होणारे पाणी अडविते. या पार्श्वभूमीत शहराच्या मुख्य ड्रेनेजची साफसफाई पावसापूर्वी व्हावी यासाठी या मेन ड्रेनेजच्या सफाईच्या कामांचा शुभारंभ सुरु करण्यात आला आहे. पेणमधील नाले सफाईचे काम मे महिन्यातच पूर्ण करण्याकडे पालिकेचा कल आहे. या मुख्य १५ ड्रेनेजच्या सफाई बरोबरीने शहराच्या पाच प्रभागातील तब्बल १९४ छोट्या - मोठ्या गटाराची स्वच्छता होण्यासाठी सफाई कामगारांचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा आपत्तीकाळात वेगवान प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग व नागरिकांना पावसाळी पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये याकडे आमचे लक्ष असल्याचे जीवन पाटील यांनी सांगितले. शहराच्या प्रभाग -१ मध्ये, ८८८३ रनिंग मीटर लांबीचे ३६ ड्रेनेज, प्रभाग २ मध्ये ५२९२ रनिंग मीटर लांबीचे ४७ ड्रेनेज, प्रभाग ३ मध्ये, ७७६७ रनिंग मीटर लांबीचे ४२ ड्रेनेज, प्रभाग ४ मध्ये, ४१७५ रनिंग मीटर लांबीचे २३ ड्रेनेज तर प्रभाग ५ मध्ये, ५३७५ रनिंग मीटर लांबीचे ४६ ड्रेनेज अशा एकूण २०४ छोट्या ड्रेनजची ३१ हजार ४९१ रनिंग लांबी असल्याचे नालेसफाई महिनाभर चालणार असल्याचे दयानंद गावडे यांनी माहिती दिली. (वार्ताहर)