शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूर पोर्टविरोधात जसखार ग्रामस्थांचा निर्धार मोर्चा

By admin | Updated: March 28, 2017 05:14 IST

जेएनपीटीअंतर्गत सुरू होणाऱ्या चौथ्या अर्थात सिंगापूर पोर्टमध्ये जसखार गावाला डावलले जात असल्याच्या निषेधार्थ आणि

उरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू होणाऱ्या चौथ्या अर्थात सिंगापूर पोर्टमध्ये जसखार गावाला डावलले जात असल्याच्या निषेधार्थ आणि जसखार ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी पोर्टविरोधात सोमवारी निर्धार मोर्चा काढला होता. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरच जेएनपीटी माजी ट्रस्टी दिनेश पाटील, कामगार नेते पी. जे. पाटील आणि दामोदर घरत यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घरटी एकास नोकरी आणि जसखार गावाला प्राधान्य न मिळाल्यास ग्रा. पं.च्या हद्दीत प्रस्तावित असलेली सिंगापूर बंदराची कामे बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.देशातील जेएनपीटी बंदराची गणना पहिल्या क्रमांकावर केली जाते. जसखार गावाशेजारीच असलेल्या जेएनपीटीअंतर्गत सर्वात मोठ्या लांबीच्या चौथे सिंगापूर बंदर उभारण्याच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र सिंगापूर पोर्ट जसखार ग्रा. पं. च्या हद्दीत असूनही त्यांना न्याय हक्कांपासून आणि नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहेत. त्याशिवाय इतरही विकासाची कामे सुरू आहेत. मात्र तरीही इतर गावांना प्राधान्य देताना जसखार गावाला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला आहे. सिंगापूर पोर्टमध्ये नोकरीभरतीमध्ये घरटी एकास नोकरी मिळावी, ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, सर्व्हिस रोड बनविण्यात यावेत, सिंगापूर पोर्टमधील व्यावसायिक, ठेकेदारीतील कामात जसखार ग्रामस्थांना प्राधान्य मिळावे, नोकरभरतीसाठी शिक्षणाची अट बारावीपर्यंत शिथिल करण्यात यावी, वयाची मर्यादा वाढविण्यात येवून प्रकल्पग्रस्त दाखल्यांऐवजी अवार्ड प्रत जोडण्याची मुभा देण्यात यावी, सर्वच कामगार भरती प्रकल्पग्रस्तांतूनच केली जावी, जसखार ग्रामस्थांच्या मागण्या आणि समस्यांबाबत जेएनपीटी पोर्ट, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आदि विभागाच्या वरिष्ठांसोबत तत्काळ ग्रामस्थांबरोबर बैठक बोलावून योग्य मार्ग काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा आयोजित केला होता. यावेळी सिंगापूर पोर्ट अधिकारी कॅप्टन धवल, प्रशासकीय अधिकारी अवधूत सावंत यांनी ठोस आश्वासन देण्यास चालढकलपणा करताच संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (वार्ताहर)