शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणे-शिहू रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:20 IST

येथून रिलायन्स कंपनीमार्गे पोयनाडकडे जाणाºया मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे

नागोठणे : येथून रिलायन्स कंपनीमार्गे पोयनाडकडे जाणाºया मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणपती सणापूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.नागोठणे-पोयनाड हा २६ कि.मी. लांबीचा मार्ग सार्वजनिक बांधकाम खाते, अलिबाग यांच्या अखत्यारीत आहे. या मार्गात पोयनाड ते गांधे दरम्यानचा रस्ता सुस्थितीत ठेवण्यात आला असला, तरी गांधेचे पुढे असणाºया शिहूपासून नागोठणेपर्यंतच्या रस्त्याची अनेक ठिकाणी दैनाच उडाली असल्याने वाहनचालक, तसेच नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गात रिलायन्सचा महाकाय प्रकल्प असून या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. रिलायन्सने हा रस्ता सुधारावा, असासुद्धा सूर येथे आळवला जात असल्याने याबाबत रिलायन्सच्या व्यवस्थापनाशी विचारणा केली असता, हा रस्ता आमचा नसल्यामुळे तो तयार करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे विचाराधीन नाही, असे स्पष्ट करण्यात आले.शिहूचे सरपंच भास्कर म्हात्रे, काँग्रेसचे नेते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता पूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता. पूर्वीच्या आयपीसीएलने (आताची रिलायन्स एनएमडी) २००७-०८ च्या दरम्यान हा रस्ता स्वखर्चाने तयार करून घेतला होता. आता हा प्रकल्प रिलायन्सच्या ताब्यात गेल्याने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सीएसआर फंडातून या रस्त्याची त्यांनी सुधारणा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हा रस्ता १५ आॅगस्टपूर्वी सुस्थितीत आणावा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा पवित्रा उचलला जाईल, असे वसंत भोईर यांनी सांगितले.