शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्फिनच्या मृत्यूचे गूढ उकलेना

By admin | Updated: September 12, 2015 22:47 IST

समुद्री पर्यावरणाचा समतोल आणि समृद्धतेचा प्रत्यय डॉल्फिनच्या अस्तित्वावरून येतो. मात्र, बोर्डी परिसरातील चिखले समुद्रकिनारी आॅगस्टअखेरीस चार आणि गुरुवार

बोर्डी : समुद्री पर्यावरणाचा समतोल आणि समृद्धतेचा प्रत्यय डॉल्फिनच्या अस्तित्वावरून येतो. मात्र, बोर्डी परिसरातील चिखले समुद्रकिनारी आॅगस्टअखेरीस चार आणि गुरुवार, १० सप्टेंबर रोजी आठ फुटी लांबीचा एक मृत डॉल्फिन आढळल्याने ही बाब समुद्र पर्यावरणाकरिता धोक्याची नांदी असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.किनाऱ्यावर मृत आढळलेल्या पाचही डॉल्फिनची विल्हेवाट वन विभागाने लावली आहे. मात्र, मृत्यूचे घटनासत्र का घडते, याबाबत सक्षम यंत्रणा नसल्याने स्थानिक पातळीवर अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. मासेमारी हंगामाच्या प्रारंभी खोल समुद्रात स्फोट घडवून अथवा अन्य मार्गाचा वापर करून डॉल्फिनला लक्ष्य केले जाते. ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये भीती निर्माण होईल, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. डॉल्फिनच्या मृत्यूचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतरही प्रशासनाकडून अधिकृत माहिती दिली जात नसल्याबद्दल नागरिकांत रोष आहे. (वार्ताहर)डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी स. ११ ते दु. ३ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मुलुंड-माटुंगा अप मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत फलाटांअभावी नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकांत लोकल उपलब्ध नसतील. हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर ब्लॉक असल्याने त्या वेळेत सीएसटीहून वाशी/बेलापूर/पनवेल स्थानकांदरम्यानची लोकल सेवा अप/डाऊन दिशांवर रद्द करण्यात येणार आहे. तसेच सीएसटी-कुर्ला आणि पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना आहे त्याच तिकीट व पासावर स. १० ते संध्या. ४ या वेळेत ट्रान्स हार्बरमार्गे प्रवासाची मुभा असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)