शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अवैध कत्तलखान्यांविरोधात महाडमध्ये मुस्लीम बांधव एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 02:19 IST

महाडमध्ये गेली काही महिन्यांत अवैध कत्तलखान्यांवर गोवंश हत्येच्या घटना पोलिसांनी केलेल्या धाडीमध्ये उघड झाल्या आहेत.

 दासगाव - महाडमध्ये गेली काही महिन्यांत अवैध कत्तलखान्यांवर गोवंश हत्येच्या घटना पोलिसांनी केलेल्या धाडीमध्ये उघड झाल्या आहेत. यामुळे मुस्लीम समाजाची बदनामी होत असून दोन समाजातील सामाजिक सलोख्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाडमधील मुस्लीम समाजाने या अवैध कत्तलखान्याविरोधात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुस्लीम समाजाने अवैध कत्तलखान्यांचा निषेध व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली.महाडमध्ये गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी गोवंश हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये स्थानिक नागरिकांचा काहीएक संबंध नसून बाहेरून येणारे पैसा कमावण्याच्या उद्देशाने स्थानिक तरुणांना हाताशी धरत असे प्रकार करीत आहेत, यामुळे सामाजिक सलोखा कायम राहावा याकरिता मुस्लीम समाजाने आज एक बैठक घेतली. या बैठकीचे आयोजन मुस्लीम एकता समिती, आवाज ग्रुप महाड, अमन फलाह कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ही बैठक महाड पोलादपूर मुस्लीम एकता कमिटीचे अध्यक्ष अल्फला देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी आवाज ग्रुपचे अध्यक्ष महंमदशफी पुरकर, मुस्लीम एकता समितीचे सचिव मन्सुर देशमुख, अ‍ॅड. कादीर देशमुख, हसनखान झटाम, गणी धामणकर, छावा संघटनेचे अध्यक्ष मुदस्सीर देशमुख, अखलाख गोडमे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सर्वानुमते गोवंश हत्येचा निषेध नोंदवण्यात आला. महाडमधील मुस्लीम समाजाचा या घटनांशी काहीएक संबंध नसून यामध्ये स्थानिक मुस्लीम नाहक बदनाम होत आहे. पोलीस प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.या वेळी महाड पोलादपूर मुस्लीम एकता समितीचे मन्सुर देशमुख यांनी महाडमध्ये बाहेरून येऊन काही लोक तालुक्यातील शांतता भंग करीत आहेत. अशा लोकांवर कारवाई केली गेल्यास तालुक्यातील गुण्यागोविंदाने राहणाºया हिंदू-मुस्लीम समाजाची एकता आबादित राहणार आहे. दोन्ही समाजात गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, असे देखील मन्सुर देशमुख यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अल्फला देशमुख यांनी शासनाने गोवंश हत्या बंदीच्या निर्णयाचे मुस्लीम समाज पालन केले जाईल व अशा प्रकारचे कृत्य करत असलेल्या लोकांवर समाज देखील पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.या वेळी मुदस्सीर पटेल, फैजल चांदले, अकबर खाजे, अशरफ कापडी, गोडमे यांनी देखील आपल्या मनोगतातून झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवला.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या