शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये १०२ उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यपदासाठी ९० जण इच्छूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:56 IST

मुरु ड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही ग्रामपंचायतींमधून सरपंचपदासाठी १२ अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

मुरु ड जंजिरा : मुरु ड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही ग्रामपंचायतींमधून सरपंचपदासाठी १२ अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. शेवटचा दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी मुरुड तहसील कार्यालयात पाहावयास मिळाली.आंबोली ग्रामपंचायतमधून थेट सरपंचपदासाठी आंबोली ग्रामविकास आघाडीकडून शिल्पा मोकल यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेनकडून कोमल माळी, आदिशा भोईर, रु चिता माळी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यासाठी प्रभाग एक मधून ६ अर्ज, प्रभाग दोन मधून ८ तर प्रभाग तीनमधून ६ अर्ज दाखल झाले आहेत.मजगाव ग्रामपंचायतमध्ये शिवसेना व काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. येथे सरपंचपदासाठी ३ उमेदवार उभे ठाकले आहेत. तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ग्रामपंचायत सदस्यासाठी २९ अर्ज दाखल झाले आहेत. इथे राष्ट्रवादी व शेकाप यांच्यात युती झाली आहे.उसरोलीत सरपंचपदासाठी ६ तर सदस्यासाठी ४१ अर्ज दाखल झाले. भारतीय जनता पार्टीकडून सरपंचपदासाठी समीर शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. उसरोलीत वाळवंटी मधील प्रभाग ४ (अ)मधून यशवंत पाटील हे शेकापचे उमेदवार आहेत.कर्जतमध्ये ३६८ उमेदवारी अर्ज दाखलकर्जत : कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवार २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्या आहेत. शनिवारी एकूण ३६८ नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. त्या मध्ये सरपंच पदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी ३२० अशी दोन्ही मिळून ३६८ नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशपत्र मागे घेण्याची मुदत जाहीर करण्यात आली आहे.मार्च २०१९ मध्ये आठ ग्रामपंचातीची मुदत संपत आहे. तालुक्यातील भालीवडी, हालीवली, ममदापूर, पळसदरी, खांडपे, चिंचवली, किरवली, सावेळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भालीवडीत सदस्यपदासाठी ३३ तर सरपंचपदासाठी ५, हालीवलीमध्ये सदस्यपदासाठी २४ तर सरपंचपदासाठी ४ अर्ज दाखल करण्यात आलेत.ममदापूरमध्ये सदस्य पदासाठी ३६ तर सरपंचपदासाठी ४, पळसदरीत सदस्य पदासाठी २७ तर सरपंचपदासाठी १४, खांडपेत सदस्य पदासाठी ६१ तर सरपंचपदासाठी ८, चिंचवलीत सदस्य पदासाठी ३८ तर सरपंचपदासाठी ५, किरवलीत सदस्य पदासाठी ५१ तर सरपंचपदासाठी ५, सावेळेत सदस्य पदासाठी ५० तर सरपंचपदासाठी ३ अर्ज आले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड