शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुरूडचा सभापती चिठ्ठीवर ठरणार?

By admin | Updated: March 9, 2017 02:24 IST

मुरुड पंचायत समितीसाठी चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाआघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस यांना एक एक जागा, तर शिवसेनेला दोन

आगरदांडा : मुरुड पंचायत समितीसाठी चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाआघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस यांना एक एक जागा, तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. यामुळे सभापती निवडीत पेच निर्माण झाला आहे. यामुळे चिठ्ठीवरच सभापती ठरणार का? की फोडाफोडीचे राजकारण बघायला मिळेल याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता असून येत्या १४ मार्च होणाऱ्या सभापती निवडीकडे मुरुड तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.मुरुड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अटीतटीने झाली. प्रथमच मुरुड तालुक्यात चौरंगी लढती पक्षाच्या चिन्हावर झाली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस, त्यामधील भाजपा पक्षाने ग्रामीण भागातून जवळपास अधिक मते घेतली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी शिवसेनेने चांगली मुसंडी मारली असे दिसून आले, त्यानुसार महाआघाडीला दोनच जागा निवडून आणण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीनंतर पंचायत समितीत आता महाआघाडीला आणि शिवसेनेला समान जागा आहेत. त्यामुळे सभापती कोणाचा याकडे लक्ष लागून आहे. अडीच-अडीच वर्षे सभापतीपद असाही समझोता होऊ शकतो, अन्यथा चिठ्ठीवरच सभापतीपदाची निवड करावी लागणार आहे. महाआघाडीमधून सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अशिका ठाकूर हे नाव निश्चित झाले, तर आय काँग्रेस उपसभापतीसाठी प्रणिता पाटील, शिवसेनेकडून नीता घाटवळ हे नाव निश्चित झाले आहे. (वार्ताहर)- १४ मार्चला ही निवडणूक मुरु ड दरबार हॉल येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याची वेळ असून, दुपारी २ वाजता सभापती निवड व उपसभापती बैठक होणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर सभापती-उपसभापतीची निवड के ली जाईल, असेतहसीलदार दिलीप यादव यांनी सांगितले.