शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड धनगरवाडीत पिकअप टेम्पो उलटला

By admin | Updated: February 7, 2016 00:24 IST

मुरुड-धनगरवाडी रस्त्यावरील वळणदार आणि उतार असलेल्या ठिकाणी रिकामा बोलेरो पिकअपचा ऐक्सल तुटला. यावेळी पिकअप टेम्पो कलंडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.

आगरदांडा : मुरुड-धनगरवाडी रस्त्यावरील वळणदार आणि उतार असलेल्या ठिकाणी रिकामा बोलेरो पिकअपचा ऐक्सल तुटला. यावेळी पिकअप टेम्पो कलंडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने गाडीतील चालक सुखरूप आहे.रोहा येथून रिकामा बोलेरो पिकअप (एमएच०६-बीजी-११०६) मुरुडकडे जात असताना दुपारी उतारावरील गाडीचा अचानक एक्सेल तुटल्यामुळे तसेच ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी कलंडली. यामध्ये चालक यशवंत हिरवे हा किरकोळ जखमी झाला असून, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुरुड-धनगरवाडी येथे अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुरुड -धनगरवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यालगत सुरक्षा कठडा बांधण्यात आलेला नाही. येथे सुरक्षा कठडा नसल्याने व छोटे वळण व उतरण असल्याने यापूर्वी याच ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. धोकादायक वळण असल्यामुळे प्रत्येक वळणावर सूचना फलकाची गरज असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)