शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंद

By admin | Updated: June 26, 2017 15:42 IST

सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंदद मुरुड येथे झाली आहे.

ऑनलाइन लोकमत/जयंत धुळप

मुरूड, दि. 26-  सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत रायगड  जिल्ह्यात सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंदद मुरुड येथे झाली आहे. तर जिल्ह्यातील इतर भागातही रविवारपासून मूसळधार पाऊस झाला. तळा भागात 140 मिमी, रोह्यात 138 मिमी, अलिबागमध्ये मिमी133, पाली(सुधागड)123 मिमी, उरण-110मिमी, माणगांव-106मिमी, पोलादपूर 99मिमी,  कर्जत 73.10मिमी, खालापूरात 68, पेण 55.40, पनवेल 53, श्रीवर्धन 53, म्हसळा 47,  महाड43, आणि गिरिस्थान माथेरान येथे 38.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासातील जिल्ह्याचं सरासरी पर्जन्यमान 93.02 मिमी आहे.
 
रविवारी अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली होती, परिणामी या दोन्ही नद्यांच्या तीरावरील एकुण 16 गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला तसंच आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी दोन्ही नद्यांच्या पातळीत घट झाल्याने संभाव्य धोका टळला असल्याचं रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. जिल्हयातील सावित्री, गाढी,पाताळगंगा,उल्हास या उर्वरित नद्यांची पातळी नियंत्रणात आहे. तसंच कोकण रल्वेची वाहतूकदेखील सुरळीत सुरु आहे. तर गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग व मुंबई-पुणे जूना महामार्ग या मार्गांवरील वाहतूकदेखील सुरळीत सुरु असल्याचं त्यांनी सांगीतलं.
दरम्यान सोमवार २६ जून २०१७ रोजी सकाळी नऊ वाजल्या पासून पूढील १२० तासात कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यानूसार जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचं सागर पाठक यांनी सांगितलं.