शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये वीज ग्राहकांकडे साडेसहा कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:51 IST

महावितरण कर्मचाऱ्यांची वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या मुरुड तालुक्यात २५ हजार ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे तालुक्यात सध्या ६ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही, तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मुरुड तालुक्यात सर्वाधिक २० हजार घरगुती ग्राहक असून, त्याची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी, व्यावसायिक २ हजार ५०० ग्राहक असून, त्याची ५० लाख रुपये थकबाकी, इतर ग्राहकांची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत. महावितरणची मुरुड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यत ३ कोटी ३५ लाख रुपये वसुली झाले असून, ३ कोटी १५ लाख रुपये थकीत आहेत असल्याचे महावितरणचे उपकार्य अभियंता - सचिन येरेकर यांनी सांगितले. कोरोनामुळे एक वर्षे लॉकडाऊन होता. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायासह सर्वसामान्यांना घरात बसून पोट भरावे लागले. शासनाने कोरोना काळातील विजबिले काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांनी विजबील माफ होण्याची वाट पाहत बसल्याने वीज ग्राहकांकडे वर्षापासूनची विजबीले थकीत राहून गेली आहेत. दरम्यान, शासनाने वीजबिले माफ होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर थकीत वीजबिलधारकांचे वीजबिल भरण्याचे शासनाने आदेश दिले.

आतापर्यंत ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आलेnबील एकाच वेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे देण्यात आली होती. कोरोना काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. nग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहान करूनही वीजबिल भरली जात नसल्याने, महावितरणाचे ७० कर्मचारी रोजच्या रोज वसुलीसाठी घरोघरी जाऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यास विनवणी करीत आहेत. घरी गेल्यानंतर वीजबिल भरले नाही, तर त्याना पुन्हा त्यांना वेळ दिली जात आहे. nवेळ देऊनही थोडेफार वीजबिल भरणा न केल्याने आतापर्यंत नाईलाजाने ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तालुक्यातील वीज ग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करा, असे आवाहन मुरुड उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड