शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हत्याकांड प्रकरणाचा अवघ्या आठ तासांत तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:19 IST

नेरळ पोलिसांनी लावला छडा; आरोपी दाम्पत्य अटकेत

n  लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : गुन्ह्यातील फरार असलेले संबंधित आरोपी चार्स नाडार व त्याच्या पत्नीला मुंबईतील मीरा रोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात कर्जतचे डीवायएसपी अनिल घेर्डीकर यांनी नेरळ-माथेरान आणि कर्जत येथील पोलीस ठाण्याचे पथक तयार केले होते, तर अलिबाग येथील एलसीबीलाही बोलावण्यात आले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ शहरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधेदेखील घटनास्थळी हजर झाले होते.नेरळ-रेल्वेस्थानक परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या मृतदेहाचे तुकडे करून या सुटकेसमध्ये भरण्यात आले होते. सुरुवातीला या मृतदेहाचे डोके सापडून न आल्याने मृत व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांना खूप अडचणी येत होत्या. मृत व्यक्तीचे डोके हे उशिरा नेरळ पूर्व भागातील नाल्यात सापडून आल्याने पोलीस तपासाला वेग आला होता. यावेळी आरोपीने मृत व्यक्तीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य-तसेच सुटकेस व मद्यपी द्रव हे नेरळ येथील व्यापारी वर्गाकडून नेले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर, गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागण्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फार मोठा उपयोग झाला होता. आरोपी नवरा-बायको असल्याचे पोलिसांसमोर येताच ते नेरळ येथील राजबाग येथील गृहप्रकल्पात गेली दोन वर्षे भाडेतत्त्वावर राहत आहेत. तर आरोपींनी मृत व्यक्तीस मारून त्याचे तुकडे सुटकेसमध्ये भरण्यात आल्यानंतरचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या माहितीच्या आधारावर नेरळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यावर मृत व्यक्ती ही वरळी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी असून त्याचे नाव सुशीलकुमार मारुती सरनाईक असल्याचे समोर आले. सुशीलकुमार यांची ओळख आरोपी नाडार यांच्या पत्नीशी सोशल मीडियावर झाली होती. यातच सरनाईक नेरळ येथे भेटण्यासाठी येत होता. सरनाईक यांची हत्या नेमकी का व कशासाठी करण्यात आली हे अद्याप समोर आले नसून नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत.