शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

नियमबाह्य इमारतीला नगरपालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:35 IST

रोह्यात खळबळ : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते चौकशीचे आदेश; इमारतीचे बांंधकाम पूररेषेत

मिलिंद अष्टिवकर 

रोहा : शहरातील पर्ल पार्क इमारतीच्या नियमबाह्य बांधकामाविरोधात आलेल्या अनेक तक्रारी आणि उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारतीच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत रोहा नगरपालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने रोहा शहरात खळबळ माजली आहे. याबाबत नगरसेविका समीक्षा बामणे आणि सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी मुख्याधिकाºयांना पत्र लिहून जाब विचारला आहे.

रोहा शहरातील अष्टमी रोडवरील गेले तीन वर्षे सुरू असलेल्या हाफिज बिल्डर यांच्या पर्ल पार्क इमारतीचे बांधकाम पूररेषेत आहे. पालिकेने मागणी करूनही बिल्डरने पाटबंधारे विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द केलेले नाही. त्याचबरोबर नगरपालिकेकडून जोता तपासणी करून, प्रमाणपत्र घेऊन जोत्यावरील बांधकाम करणे नियमाधीन असतानाही बिल्डरने जोता तपासणी प्रमाणपत्र न घेताच बांधकाम सुरू ठेवले होते, या सर्व प्रकारामुळे नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी या बिल्डरला बांधकाम थांबविण्यासंबंधी नोटीस बजावली होती. त्यानंतरही बिल्डरने नियमबाह्य बांधकाम सुरू ठेवले होते. तत्कालीन पालिकेचे गटनेते महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम बंद करण्याच्या दिलेल्या आदेशांनाही हाफिज बिल्डरने काही दिवसांतच केराची टोपली दाखविली होती. परिणामी, मुख्याधिकारी रोहा यांनी हाफिज बिल्डरचे बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी नगरपालिकेच्या अवारात पर्ल पार्क विरोधात आमरण उपोषणही केले होते. त्या वेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी कारवाईची लेखी हमी दिल्याने उस्मान रोहेकर यांनी त्यांचे उपोषण थांबविले होते.या इमारतीबाबत झालेल्या तक्रारींची जिल्हाधिकारी यांनीही दखल घेतली होती. इमारतीच्या आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल अभिप्रायासह तातडीने देण्याची सूचना रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना केली होती. या इमारतीची चौकशी न करताच जिल्हाधिकाºयांचे आदेश धाब्यावर बसवत पर्ल पार्क या बेकायदेशीर इमारतीला रोह्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी भोगवटा प्रमाणपत्र दिल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी होणाºया सिटिझन्स फोरमच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते आहे.पर्ल पार्क इमारती संबंधित काही त्रुटी असल्या तरीही बांधकामास विकास नियंत्रण नियमावली अनुसार भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे.- बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी, रोहा नगरपालिकापर्ल पार्क इमारतीविरोधात १२ लेखी तक्रार अर्ज पुराव्यासहित पालिकेकडे केलेले आहेत. पूर्व मुख्याधिकाºयांनी नोटीस बजावून ही इमारत अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले असतानाही मुख्याधिकाºयांनी भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. ते बेकायदेशीर असून पुढे होणाºया सर्व कायदेशीर बाबींना ते स्वत: जबाबदार असतील.- उस्मान रोहेकर, सामाजिक कार्यकर्ते रोहा.ही इमारत बेकायदेशीर असून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर होत असल्याची तक्रार पुराव्यानिशी करून, या इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करावा अशी मागणी केली होती, असे असताना मुख्याधिकाºयांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र दिले असल्याने या विरोधात नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार करणार आहोत.- समीक्षा बामणे, नगरसेविका

टॅग्स :Raigadरायगड