शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नगरपरिषदेने थकविली पाणीपट्टी

By admin | Updated: March 17, 2016 02:27 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीसह महाड नगरपरिषदेकडे पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.

महाड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीसह महाड नगरपरिषदेकडे पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून थकीत रकमा भरण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी महाड नगरपरिषदेकडे असून दंड व व्याजासह ही थक बाकीची रक्कम सुमारे ९ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे महामंडळाच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.महाड नगर परिषदेसह औद्योगिक परिसरातील व खाडीपट्टा भागातील ग्रामपंचायतींना औद्योगिक महामंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जातो. महाड शहराच्या पूर्व भागाला गेल्या पंधरा वर्षांपासून याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महाड नगरपरिषदेकडे औद्योगिक महामंडळाने दंड व्याजासह ९ कोटी ३९ कोटी रुपयांची थकीत बाकी असली तरी नगरपरिषद आणि महामंडळामध्ये पाण्याच्या दरावरून गेली अनेक वर्षे वाद आहेत. प्रति हजारी ७ रुपये दराने महामंडळाकडून पाणी बिलाची आकारणी केली जात असून नगरपरिषदेला महामंडळाचा हा ७ रुपयांचा दर मान्य नाही. त्यामुळे दरमहा ७ रु. दराने आकारलेल्या बिलापोटी ३ रु. प्रति हजार लि. दराने नगरपरिषदेकडून अंडरप्रोटेस्ट बिलाची रक्कम नियमितपणे दरमहा भरण्यात येत आहे. वाढलेली थकबाकी ही दराच्या वादामुळे असली तरी यावर तोडगा न काढल्यास ही थकीत रक्कम वर्षानुवर्षे वाढतच राहणार आहे.मंत्रालय पातळीवर याबाबत अण्णासाहेब सावंत नगराध्यक्ष असल्यापासून अनेकवेळा प्रयत्न केले गेले, मात्र महामंडळाकडून पाण्याचा दर कमी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. दरमहा नगरपरिषदेकडून महामंडळाला पाणी बिलापोटी सुमारे सव्वा लाख रुपये ते दीड लाख रुपये नियमितपणे अदा केले जात आहेत.ग्रामपंचायतीकडील थकबाकी महामंडळाकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या आसनपोई ग्रामपंचायतीकडे १६ लाख ६१ हजार ५२५ रुपये, कांबळे ग्रामपंचायतीकडे १० लाख ८४ हजार रुपये, सवाणे ग्रामपंचायतीकडे १० लाख ५६ हजार इतकी थकबाकी असून नडगाव ७ हजार ९४७, सवाणे बौद्धवाडी ३ लाख ३३ हजार ६९२, जीते ३ लाख ५८७, बिरवाडी ६ लाख १० हजार ७७१. ३ कोटी ३४ लाख रुपयांची बिलेखरवली ७ लाख ७९ हजार ५७३, राजेवाडी ३ लाख ३२ हजार ७९६, कोल १६ हजार ६५०, दादली १ लाख ९० हजार ९५९, चोचिंदे १ लाख ३२ हजार २६०, गोठे बुद्रुक ५१ हजार ६४४, किंजळघर १ लाख ५३ हजार ५०५, वडवली २३ हजार ४८१, चोचिंदे १४ हजार ३६५, नडगाव १ लक्ष ३ हजार ६३३, कोल १९ हजार ३७८, सव बौद्धवाडी ९९ हजार ९४५, कोसबी २ हजार ७५०, जीते ६३ हजार ३६८, अशी सर्व ग्रामपंचायतींची व महाड नगरपरिषद मिळून ३ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपट्टीची बिले थकीत .