शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद कार्यालय कम्युनिटी सेंटरमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:44 IST

माथेरानमधील नागरिकांना दिलासा; डागडुजी, साफसफाईची गरज

माथेरान : नगरपरिषद स्थापन झाल्यापासून हेरिटेज दर्जा प्राप्त असलेले नगरपरिषद कार्यालय अनेक वर्षांपासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत आहे. बाजारपेठेपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्यालयात नागरिकांना पायपीट करीत समस्या अथवा कामे घेऊन जावे लागते, त्यामुळे नागरिकांची दमछाक होते. त्यातच ज्येष्ठ नागरिकांना हा दूरवरचा पायी प्रवास जिकिरीचा आहे.जुन्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांना बसण्याची योग्य सोय नाही, सभापतींसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध नाहीत, जागेची कमतरता तसेच कर्मचाऱ्यांवर अंकुश राहण्यासाठी आणि अन्य बाबींच्या अभावामुळे एकंदरच कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील काळात २००१ मध्ये प्रस्थापित असलेल्या सत्ताधारी गटाने हे हेरिटेज कार्यालय नव्याने उभारलेल्या शास्त्री हॉल (कम्युनिटी सेंटर) येथे हलविण्यात यावे, असे सुचविले होते. सध्या कार्यरत शिवसेनेच्या सत्ताधारी गटाने हा विषय तडीस नेण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून जुने कार्यालय कम्युनिटी सेंटर येथे हलविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्याबाबत कायदेशीर पूर्तता करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विचारात घेऊन २९ जानेवारी २०१८ मध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्या वेळेस विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कुठल्याही प्रकारची हरकत वा तक्र ार केली नाही. सद्यस्थितीत कम्युनिटी सेंटरमध्ये वर्षातून दोन ते चार कार्यक्र म आयोजित केले जातात.कम्युनिटी सेंटरमध्ये नगरपरिषद कार्यालय स्थलांतरित झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांनाही हे ठिकाण रेल्वे स्टेशन जवळ असल्याने सोयीस्कर ठरणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खर्चासाठी प्रशासकीय वित्तीय मंजुरी घेण्यात आली आहे. कम्युनिटी सेंटरमध्ये प्लायवूड पार्टिशन, फर्निचर, विद्युतीकरण, स्वच्छतागृह व अनुषांगिक कामे करणे आवश्यक आहे. हा निधी कामांअभावी माघारी जाणार असल्याने विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी वरिष्ठांना निवेदन सादर करून बाळासाहेब ठाकरे सभागृह दुरुस्ती आणि कम्युनिटी सेंटर येथे नगरपरिषद कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी जवळपास दोन कोटींपेक्षाही अधिक निधी वापरात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.विकासकामे पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांना विचारात घेऊन मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. जुन्या कार्यालयात आरोग्य विभाग तसेच नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांचे दालन तसेच ठेवणार असून, जुन्या इमारतीचे सुशोभीकरण करणार आहोत. मॉनेटरिंग कमिटीच्या परवानगीने आम्ही जुन्या कार्यालयाचे स्थलांतर करीत आहोत.- प्रसाद सावंत, गटनेते,बांधकाम सभापती, माथेरान

टॅग्स :Raigadरायगड