शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

 मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प: आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता

By वैभव गायकर | Updated: August 16, 2024 06:39 IST

उद्यापासून २,००० मेगावॅट अतिरिक्त वीज

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पातून विजेचा अखंडित वीजप्रवाह सुरू होणार असल्यामुळे मुंबई प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांची वारंवार खंडित होणारी वीज, लोडशेडिंग आणि ग्रीड फेल होण्याच्या धोक्यातून आता मुक्तता होणार आहे. पनवेलमध्ये या प्रकल्पाचे २३ किमी मार्गातून ५० पेक्षा अधिक टॉवर जात आहेत.

या प्रकल्पामुळे २००० मेगावॅट अतिरिक्त वीज निर्माण होणार असल्यामुळे मुंबई उपनगर, नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. १७ ऑगस्टपासून या प्रकल्पातून ही वीज प्रवाहित होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढतच आहे. 

४०० टाॅवरची उभारणी

पडघे ते पनवेलदरम्यान ४०० पेक्षा अधिक टॉवर यासाठी उभारले आहेत. थेट गुजरातमधून महाराष्ट्राला जोडणारा हा ऊर्जा प्रकल्प आहे. २०२२ साली लोकाभिमुख प्रकल्पातील भूसंपादनासाठी धोरण निश्चिती करून भूधारकांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येत आहे.

१०,७२८ भूधारकांना कायमस्वरूपी मोबदला

या प्रकल्पामध्ये जवळपास १०,७२८ भूधारकांना कायमस्वरूपी मोबदला मिळणार आहे. मुंबई प्राधिकरण क्षेत्रातील नागरिक, शेतकरी, भूधारक, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक या सगळ्यांनाच याचा लाभ होणार असल्यामुळे राज्याच्या इतिहासात हा प्रकल्प मैलाचा दगड म्हणून  ओळखला जाईल. मुंबई प्राधिकरण क्षेत्र ऊर्जा सक्षम झाल्याने लोडशेडिंग आणि वारंवार खंडित वीजपुरवठ्यापासून देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनापासून मुक्तता मिळणार असल्याचा दावा मुंबई ऊर्जा प्रकल्प प्राधिकरणाने केला आहे.

महत्वाकांक्षी प्रकल्प

झपाट्याने वाढणारे निवासी क्षेत्र, औद्योगिक वसाहती ते अगदी वाहन इंधन क्षेत्र या साऱ्याच ठिकाणी अतिरिक्त विजेची मागणी सातत्याने होत असते. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ही निकड तातडीने ओळखून  देशभरातील विकसनशील राज्यांना ऊर्जा सक्षम बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याचाच भाग म्हणून मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प राबविण्यात येत आहे. येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकासाच्या प्रकल्पांसाठी वीज हाच प्रमुख ऊर्जास्रोत असेल. त्यामुळे उद्योगांकरिता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये येणारी अतिरिक्त वीज ही फायदेशीर ठरणार आहे.

टॅग्स :electricityवीज