शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणावर मल्टीपर्रपज बोटचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:56 IST

जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली असून तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे.

उरण : जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली असून तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे. या बोटीचा उपयोग हरित आणि स्वच्छ बंदर ठेवण्यासाठी अर्थात पर्यावरण संवर्धन आणि सागरी वाहतुकीसाठी मोठी मदत होणार असल्याचा दावा जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष निरज बन्सल यांनी केला आहे.जेएनपीटी बंदरात अनेक वेळा तेल गळतीचे प्रकार होतात. यामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय पर्यावरणालाही बाधा पोहोचत असते. त्याशिवाय दररोज समुद्रातून वाहून येणाºया स्वच्छतेचे ध्येय ध्यानी घेवून व यावर उपाययोजना करण्यासाठी मल्टीपर्रपज युटीलिटी बोटीची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली आहे. एसएचएम शिपकेअर मुंबई कंपनीकडून घेतलेल्या भाड्याच्या बोटीच्या वेगाची क्षमता २० सागरी मैल इतकी आहे, तर बोटीची लांबी साडेबारा मीटर आहे. त्याशिवाय बोटीची १२ प्रवासी आणि ४ कर्मचारी अशी एकूण १६ प्रवासी वाहतुकीची क्षमता आहे. बोटीची बांधणी एफआरपी पद्धतीने केली आहे. बोटीत ४४८ क्षमतेचे दोन इंजिन बसविण्यात आले आहेत.तेलाचे प्रदूषण रोखणे आणि कचरा साफ करण्यासाठी ५-१० एम - ३ /स्किमरची क्षमता असलेली यंत्रणा या बोटीत बसविण्यात आली आहे. समुद्रात पसरणाºया तेलाचा संग्रह करण्याची प्रणाली या बोटीत बसविण्यात आली असून त्याची क्षमता ५० लिटर ओएसडी इतकी आहे. तसेच या बोटीत समुद्रात वाहून नेणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही बसविण्यात आली आहे. याचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे. त्याशिवाय समुद्रातील बोया आणि त्याचे दिवे तपासणी करण्यासाठी डेकवर बोलार्ड व्यवस्था करणे व सागरी सुरक्षा, पायलटसाठीही बोटीची मदत होणार असल्याची माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी कॅ. क पूर यांनी यावेळी दिली.चौकट:हरित आणि स्वच्छ बंदर ठेवण्यासाठी व पर्यावरण संवर्धन आणि सागरी वाहतुकीसाठी होणाºया बोटीचे उद्घाटन जेएनपीटी बंदराचे प्रभारी निरज बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. बंदरातील वाढती मालवाहतूक आणि सागरी स्वच्छतेचे ध्येय लक्षात घेता अशा मल्टीपर्रपज युटीलिटी बोटीची जेएनपीटीला नितांत गरज होती.हरिर पोर्टअंतर्गत विविध उपक्रमांसाठी ही बोट महत्त्वाचे काम करेल असा विश्वास जेएनपीटी अध्यक्ष निरज बन्सल यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

टॅग्स :Raigadरायगड